एचएसबीसी म्युच्युअल फंडकडून रेडहेक्स हायब्रिड लाँग-शॉर्ट फंड लाँच
* एनएफओ कालावधी : २ ते १६ जून २०२६ किमान अर्ज रक्कम : १०,००,००० रूपये (एक्युरेडिटेड गुंतवणूकदारांसाठी १,००,००० रूपये) मुंबई, 3 जून (हिं.स.) : एचएसबीसी म्युच्युअल फंडने रेडहेक्स हायब्रिड लाँग-शॉर्ट फंड लाँच केला आहे. हे स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट
HSBC Mutual Funds Redhex Hybrid


* एनएफओ कालावधी : २ ते १६ जून २०२६

किमान अर्ज रक्कम : १०,००,००० रूपये (एक्युरेडिटेड गुंतवणूकदारांसाठी १,००,००० रूपये)

मुंबई, 3 जून (हिं.स.) : एचएसबीसी म्युच्युअल फंडने रेडहेक्स हायब्रिड लाँग-शॉर्ट फंड लाँच केला आहे. हे स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंड (एसआयएफ) धोरण आहे, जे नियमित परतावा आणि भांडवल वाढ शोधणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी डिझाइन करण्यात आले आहे. हे धोरण बाजारपेठेच्या विविध चक्रांमध्ये जोखीम-समायोजित परतावा मिळवण्यासाठी फिक्स्ड इन्कम, इक्विटी आर्बिट्रेज, आरईआईटी आणि इनविट (INVIT) युनिट्स अशा विविध मालमत्ता वर्गांमधील गुंतवणुकींना एकत्र करते. या न्यू फंड ऑफरचा (एनएफओ) कालावधी २ जून २०२६ ते १६ जून २०२६ पर्यंत खुला राहील.

पारंपारिक म्युच्युअल फंड आणि पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस (पीएमएस) व अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड्स (एआयएफ) यांसारख्या मोठ्या गुंतवणुकीच्या उत्पादनांमधील तफावत दूर करण्यासाठी एसआयएफ संकल्पना सुरू करण्यात आली होती. रेडहेक्स हायब्रिड लाँग-शॉर्ट फंड हा मध्यम स्वरूपाचा गुंतवणूक पर्याय प्रदान करतो, जो म्युच्युअल फंडांची नियामक पारदर्शकता आणि पोर्टफोलिओची स्थिरता यांना एकत्र करतो.

हे उत्पादन ‘मिड-तिकीट' गुंतवणूकदारांसाठी (मध्यम आकाराची गुंतवणूक करणारे) अत्यंत योग्य आहे आणि यासाठी किमान अर्ज रक्कम १०,००,००० रूपये (तर एक्युरेडिटेड गुंतवणूकदारांसाठी १,००,००० रूपये) निश्चित करण्यात आली आहे.

बेंचमार्क: निफ्टी ५० हायब्रिड कॉम्पोझिट डेब्‍ट ५०:५० इंडेक्स

एचएसबीसी म्युच्युअल फंडाचे सीईओ कैलास कुलकर्णी म्हणाले, “आजचे गुंतवणूकदार अधिक जागरूक आहेत आणि त्यांना अद्वितीय उपायांची गरज आहे, जे व्यावसायिकपणे व्यवस्थापित असतील आणि बाजारपेठेच्या गुंतागुंतीच्या परिस्थितीमध्ये यशस्वीपणे मार्ग काढण्यासाठी तयार केलेले असतील. रेडहेक्स हायब्रिड लाँग-शॉर्ट फंड व्यावहारिक सुवर्णमध्य म्हणून डिझाइन करण्‍यात आला आहे, जो गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंडांकडून अपेक्षित असलेली स्पष्टता प्रदान करतो, सोबत अशा उत्पादनाची अतिरिक्त स्थिरता देतो, जो कमी अस्थिर राहून उत्कृष्ट आणि कर-कार्यक्षम जोखीम-समायोजित परतावा देईल.”

एचएसबीसी म्युच्युअल फंडाचे फिक्स्ड इन्कमचे सीआयओ श्रीराम रामनाथन म्हणाले, “आमचा भर योग्य क्रेडिट निवड आणि जोखीम नियंत्रणावर आहे, ज्याचे उद्दिष्ट बाजारपेठेच्या सर्व चक्रांमध्ये कमी अस्थिरतेसह उच्च उत्पन्न क्षमता प्रदान करणे आहे. हा फंड मोजक्या आणि सुनियोजित पद्धतीने आरईआयटी आणि इनविट्स (INVITs) मध्ये देखील गुंतवणूक करण्याचे उद्दिष्ट ठेवतो, जे दोन्ही वेगाने वाढणारे मालमत्ता वर्ग आहेत.”

या फंडाच्या धोरणाचा बाजारपेठेतील चढ-उतारांना मर्यादित संवेदनशील राहून नियमित उत्पन्न मिळवून देणाऱ्या विविध मालमत्ता वर्गांमधील वैविध्यपूर्ण वाटपाद्वारे तुलनेने कमी अस्थिरतेसह प्रबळ उत्पन्न क्षमता प्रदान करण्‍याचा मनसुबा आहे. तसेच कर कार्यक्षमता आणि जोखीम-समायोजित परतावा वाढवण्‍याचे ध्‍येय आहे. इंटरव्हल इन्व्हेस्टमेंट फंड म्हणून संरचित असलेला हा फंड कोणत्याही कामकाजाच्या दिवशी सबस्क्रिप्शन (गुंतवणूक) करण्याची सुविधा देतो आणि साप्ताहिक रिडेम्प्शन (पैसे काढण्याची) सुविधा ऑफर करतो. या सर्वांच्या पाठीशी प्रबळ जोखीम व्यवस्थापन आहे, जे अस्थिरता कमी करण्यात मदत करण्यासाठी दृढ धोरण-स्तरीय जोखीम नियंत्रणांसह सक्रिय पोर्टफोलिओ व्यवस्थापनाचे संयोजन करते.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande