इराणच्या ड्रोन हल्ल्यात कुवेत विमानतळाचे मोठे नुकसान; विमानसेवा स्थगित, अनेक जण जखमी
कुवैत सिटी, 03 जून (हिं.स.)।इराणने बुधवारी कुवेत आणि बहरेनमधील अमेरिकन लष्करी तळांवर अनेक क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये कुवेतच्या विमानतळाचेही मोठे नुकसान झाले आहे. कुवेतने याबाबत माहिती देताना सांगितले की, देशाच्या विमानतळावर
इराणच्या ड्रोन हल्ल्यात कुवेत विमानतळाचे मोठे नुकसान; विमानसेवा स्थगित, अनेक जण जखमी


कुवैत सिटी, 03 जून (हिं.स.)।इराणने बुधवारी कुवेत आणि बहरेनमधील अमेरिकन लष्करी तळांवर अनेक क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये कुवेतच्या विमानतळाचेही मोठे नुकसान झाले आहे. कुवेतने याबाबत माहिती देताना सांगितले की, देशाच्या विमानतळावर इराणी ड्रोन हल्ला झाल्यानंतर व्यावसायिक विमानसेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले आहेत.

या प्रकरणी कुवेतच्या परराष्ट्र मंत्रालयाने हल्ल्यांसाठी इराणला जबाबदार धरत म्हटले की, बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोनद्वारे सातत्याने हल्ले केले जात असून ते प्रादेशिक सुरक्षेसाठी गंभीर धोका आहेत. मंत्रालयाच्या माहितीनुसार, पहाटे झालेल्या या हल्ल्यात विमानतळासह अनेक महत्त्वाच्या नागरी ठिकाणांना आणि राजनैतिक परिसरांना नुकसान झाले.

कुवेतने या हल्ल्यांना आक्रमक आणि अस्वीकार्य ठरवत म्हटले की, हे आंतरराष्ट्रीय कायदा, संयुक्त राष्ट्र सनद आणि सुरक्षा परिषदेच्या ठरावांचे उल्लंघन आहे. कुवेत सरकारने स्पष्ट केले की देशाची सार्वभौमता आणि नागरिकांची सुरक्षा ही ‘रेड लाईन’ असून कोणत्याही परिस्थितीत त्याचा भंग सहन केला जाणार नाही. सरकारने प्रत्युत्तरात्मक उपाययोजनांवर विचार सुरू असल्याचे संकेत दिले आहेत.

संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल सौद अब्दुलअझीझ अल-ओतैबी यांनी सांगितले की, हल्ल्यानंतर आपत्कालीन सेवा आणि वैद्यकीय पथके तातडीने कार्यरत करण्यात आली. जखमींवर उपचार सुरू असून या हल्ल्यात इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे. हा ड्रोन हल्ला इराण आणि अमेरिका यांच्यात मंगळवारी उशिरा रात्री झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांनंतर करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande