महिला टी-२० विश्वचषकापूर्वी भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धची मालिका २-१ ने गमावली
टॉन्टन, 03 जून (हिं.स.) । २०२६ च्या महिला टी-२० विश्वचषकापूर्वी भारतीय क्रिकेट संघला इंग्लंडकडून मालिकेत पराभव सहन करावा लागला. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघला तीन सामन्यांची टी-२० मालिका २-१ ने गमवावी लागली . टॉन्टन येथे खेळल्या गेलेल्या अंत
भारतीय महिला क्रिकेट संघ


टॉन्टन, 03 जून (हिं.स.) । २०२६ च्या महिला टी-२० विश्वचषकापूर्वी भारतीय क्रिकेट संघला इंग्लंडकडून मालिकेत पराभव सहन करावा लागला. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघला तीन सामन्यांची टी-२० मालिका २-१ ने गमवावी लागली . टॉन्टन येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला बाद १८० धावांचा बचावही करता आला नाही. ॲलिस कॅप्सी (८२) आणि माजी कर्णधार हेदर नाईट (७०) यांच्या खेळीमुळे इंग्लंडने नऊ चेंडू शिल्लक असताना सहा गडी राखून विजय मिळवला. कॅप्सी आणि नाईटने चौथ्या विकेटसाठी १३७ धावांची भागीदारी करून इंग्लंडसाठी विजय निश्चित केला.

कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नाबाद ५६ धावा आणि दीप्ती शर्मा व यास्तिका भाटिया यांच्या प्रत्येकी ३२ धावांच्या जोरावर भारतीय संघाने पाच गडी बाद १८० धावा केल्या. भारतीय संघ शेवटच्या षटकांमध्ये जास्त धावा करू शकला नाही. सलामीवीर स्मृती मंधाना (८) आणि शफाली वर्मा (११) पुन्हा अपयशी ठरल्या. दोघीही ३६ धावांवर बाद झाल्या. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या यास्तिकाने मागील सामन्यातील अपयशातून सावरत झटपट धावा केल्या. तिने सात चौकारांसह १८ चेंडूंमध्ये ३२ धावा केल्या. सोफी एक्लेस्टोनने तिला धावबाद केले.

जेमिमा रॉड्रिग्जनेही चार चौकारांसह २९ धावा करत झटपट धावा केल्या. त्यानंतर हरमनप्रीत आणि दीप्तीने ५४ चेंडूंमध्ये ६७ धावांची भागीदारी केली. धावगती मंदावल्याने भारताला २०० धावांचा टप्पा गाठता आला नाही. इंग्लंडकडून लॉरेन बेलने दोन बळी घेतले, तर लिन्सी स्मिथ आणि चार्ली डीन यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.भारताच्या अरुंधती रेड्डी आणि क्रांती गॉड या वेगवान गोलंदाजांनी धावांचा पाठलाग करताना इंग्लंडला सुरुवातीलाच गुडघे टेकायला लावले. आघाडीचे तीन फलंदाज ३८ धावांवर बाद झाले. सोफिया डंकली १६ धावांवर रेड्डीच्या गोलंदाजीवर बाद झाली, तर गोडेने डॅनी वायट-हॉज (५) आणि एमी जोन्स (२) यांना बाद केले. पण चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या कॅप्सी आणि पाचव्या क्रमांकावर आलेल्या नाईटने सामना हातातून काढून घेतला. त्यांनी १९ चौकार आणि तीन षटकार ठोकले.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande