रत्नागिरीत ६ व ७ जून २०२६ रोजी डुप्लिकेट, पेअर ब्रिज स्पर्धा
रत्नागिरी, 2 जून (हिं.स.) रत्नागिरी जिल्हा ब्रिज असोसिएशनने ६ व ७ जून २०२६ रोजी दिवंगत प्राचार्य डॉ. सुभाष देव स्मृती भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार रवींद्र चव्हाण यांच्या सौजन्याने राज्यस्तरीय ब्रिज स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा स
रत्नागिरीत ६ व ७ जून २०२६ रोजी डुप्लिकेट, पेअर ब्रिज स्पर्धा


रत्नागिरी, 2 जून (हिं.स.) रत्नागिरी जिल्हा ब्रिज असोसिएशनने ६ व ७ जून २०२६ रोजी दिवंगत प्राचार्य डॉ. सुभाष देव स्मृती भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार रवींद्र चव्हाण यांच्या सौजन्याने राज्यस्तरीय ब्रिज स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा साळवी स्टॉप येथील नक्षत्र हॉल येथे होणार आहे. स्पर्धेत पहिल्या दिवशी डुप्लिकेट हा टीम इव्हेंट होणार असून दुसऱ्या दिवशी पेअर हा इव्हेंट होणार आहे.

शनिवार दिनांक ६ जून २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता स्पर्धेचे उद्घाटन प्राचार्य कै. डॉ. सुभाष देव यांच्या पत्नी श्रीमती सुखदा देव यांच्या हस्ते होणार असून त्यानंतर डुप्लिकेट या ब्रिजच्या प्रकाराने स्पर्धेला सुरुवात होईल. यामध्ये प्रत्येकी ८ बोर्डाचे सहा किंवा ७ राऊंड खेळवले जातील. यामधून चार किंवा सहा संघ अंतिम फेरीसाठी पात्र होतील.

रविवार दिनांक ७ जून रोजी डुप्लिकेट या ब्रिजच्या प्रकाराची अंतिम फेरी दिवसभर चालू असेल. त्याचवेळी उर्वरित सर्व खेळाडूंचा पेअर हा इव्हेंट चालू होईल. खेळाडूंच्या संख्येनुसार डुप्लिकेट या ब्रिजच्या प्रकारामध्ये पहिले चार किंवा सहा संघ बक्षीसपात्र ठरतील; तर पेअर या प्रकारामधून क्रमानुसार पहिले चार क्रमांक बक्षीसपात्र ठरतील.

या स्पर्धेत मुंबई, पुणे, गोवा, बेळगावी, कोल्हापूर, राजापूर, देवगड, खेड, सावंतवाडी इत्यादी भागांतून आणि यजमान रत्नागिरीतील खेळाडू सहभागी होणार आहेत. एका टीममध्ये कमीतकमी चार व जास्तीतजास्त सहा खेळाडू असतात; तर एका पेअरमध्ये कमीतकमी दोन व जास्तीतजास्त तीन खेळाडू असतात.या स्पर्धेत विजेत्यांना एकूण ४३ हजार रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. स्पर्धेचे संचालक (डायरेक्टर) म्हणून राजीव देव काम पाहणार असून स्कोअरर म्हणून श्री. विश्वनाथ काम पाहणार आहेत.

ब्रिज हा जागतिक दर्जाचा पत्त्यांचा खेळ असून ऑलिंपिकमध्येही याचा समावेश करण्यात आला आहे. सर्व रत्नागिरीकरांनी स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला आणि सामन्यांना उपस्थित राहून खेळाडूंचा उत्साह वाढवावा व स्पर्धेचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा ब्रिज असोसिएशनचे अध्यक्ष मोहन दामले आणि सेक्रेटरी सचिन जोशी यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande