राष्ट्रकुल खेळांपूर्वी भारताला मोठा धक्का, के. एम. दीक्षा डोपिंग चाचणीत दोषी
नवी दिल्ली, 03 जून (हिं.स.) । राष्ट्रकुल खेळांपूर्वी भारताला मोठा धक्का बसला आहे. देशाची अव्वल मध्यम-अंतराची धावपटू, के. एम. दीक्षा, डोपिंग प्रकरणात अडकली आहे. १५०० मीटर राष्ट्रीय विक्रमधारक असलेल्या दीक्षाला ''नाडा'' (NADA) कडून कळवण्यात आले आहे
के. एम. दीक्षा


नवी दिल्ली, 03 जून (हिं.स.) । राष्ट्रकुल खेळांपूर्वी भारताला मोठा धक्का बसला आहे. देशाची अव्वल मध्यम-अंतराची धावपटू, के. एम. दीक्षा, डोपिंग प्रकरणात अडकली आहे. १५०० मीटर राष्ट्रीय विक्रमधारक असलेल्या दीक्षाला 'नाडा' (NADA) कडून कळवण्यात आले आहे की तिच्या नमुन्यात एक प्रतिबंधित पदार्थ आढळला आहे.जरी तिच्यावर अद्याप तात्पुरती बंदी घालण्यात आलेली नसली तरी, डोपिंगमधील तिच्या दोषसिद्धीमुळे राष्ट्रकुल खेळांसाठीच्या तिच्या पात्रतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दीक्षाला कळवण्यात आले आहे की, तिच्या नमुन्यात एक प्रतिबंधित पदार्थ आढळला आहे. तिचा नमुना स्पर्धेबाहेर गोळा करण्यात आला होता आणि तिला मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पत्राद्वारे कळवण्यात आले. तिच्या नमुन्यात 'स्टॅनोझोलॉल' (Stanozolol) हा पदार्थ आढळला, जो जागतिक उत्तेजक-विरोधी संस्थेच्या (WADA) प्रतिबंधित यादीत आहे.

दीक्षावर संभाव्य चार वर्षांच्या बंदीची कारवाई होऊ शकते. गेल्या वर्षी, दीक्षाने लॉस एंजेलिसमधील 'साउंड रनिंग ट्रॅक फेस्ट'मध्ये ४:०४.७८ सेकंदांच्या वेळेसह तिसरे स्थान मिळवून राष्ट्रीय विक्रम मोडला होता. तिने २०२१ च्या राष्ट्रीय खुल्या ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये हरमिलन बेन्सने नोंदवलेला ४:०५.३९ सेकंदांचा पूर्वीचा विक्रम मोडला होता.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande