देवएक्सचा बंगळुरुमध्ये विस्तार; प्रेस्टिज ग्रुपसोबतच्या भागीदारीत १.११ लाख चौरस फूट जागेत कार्यक्षेत्राची उभारणी
मुंबई, 03 जून, (हिं.स.)। भारतातील अग्रगण्य प्रीमियम व्यवस्थापित कार्यक्षेत्र पुरवठादारांपैकी एक आणि हुरुन इंडिया मान्यताप्राप्त देव एक्सलरेटर लिमिटेडने (देवएक्स) आपल्या व्यवसायाचा विस्तार केला आहे. ही कंपनी देशभरात वेगाने विस्तारत आहे. या कंपनीने प
बंगळुरु


मुंबई, 03 जून, (हिं.स.)। भारतातील अग्रगण्य प्रीमियम व्यवस्थापित कार्यक्षेत्र पुरवठादारांपैकी एक आणि हुरुन इंडिया मान्यताप्राप्त देव एक्सलरेटर लिमिटेडने (देवएक्स) आपल्या व्यवसायाचा विस्तार केला आहे. ही कंपनी देशभरात वेगाने विस्तारत आहे. या कंपनीने प्रसिद्ध प्रेस्टिज ग्रुपसोबत भागीदारी केली आहे. या भागीदारी अंतर्गत बंगळुरुच्या बाह्य वळण रस्ता भागात दोन प्रीमियम ग्रेड ए+ कार्यालयीन जागांचे अधिग्रहण केले आहे. हा विस्तार १.११ लाख चौरस फूट क्षेत्रात विस्तारलेला आहे. या नवीन कार्यालयांमुळे देवएक्सच्या पोर्टफोलिओमध्ये १ हजार २०० रुपयांहून अधिक जागांची भर पडणार आहे. या नवीन विस्तारामधून कंपनीला दरमहा सुमारे २.२ कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

कंपनीचे पहिले व्यावसायिक केंद्र लेकेशोर ड्राईव्ह येथे बेळंदर तलावच्या समोर उभारण्यात आले आहे. हे केंद्र ९० एकरमध्ये पसरलेल्या एका भव्य कॉर्पोरेट कॅम्पसमध्ये आहे. या कॅम्पसमध्ये जगातील अनेक मोठ्या कंपन्यांची कार्यालये आहेत. या उच्च दर्ज्याच्या कॉर्पोरेट परिसरातील कंपनीचे स्थान उत्कृष्ट नेटवर्किंग आणि पायाभूत सुविधांकरिता फायदेशीर ठरेल. आधुनिक कंपन्यांच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन या प्रीमियम केंद्राची रचना करण्यात आली आहे. १ ऑगस्ट २०२६ रोजी हे व्यावसायिक केंद्र सुरु केले जाईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. या केंद्राची सजावट आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी सुमारे १० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे.

प्रेस्टिज फेदरलाईट टेक हब हा कंपनीचा दुसरा प्रकल्प आहे. हा प्रकल्प सर्व सोयीसुविधांनी सुसज्ज असल्याने अ श्रेणीत मोडतो. हा प्रकल्प घरातून कामाच्या ठिकाणी चालत जा या संकल्पनेला प्रोत्साहन देतो. प्रवासादरम्यानचा वेळ वाचवणे, कर्मचा-यांचा कामाचा अनुभव सुधारणे आणि कामाची कार्यक्षमता वाढवणे या गोष्टींना प्राधान्य देणा-या व्यावसायिक ग्राहकांसाठी हे केंद्र उत्तम पर्याय आहे.

देव एक्सलेटर लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री. उमेश उत्तमचंदानी यांनी या विकासाबाबत आपले मत मांडले. ते म्हणाले, “बंगळुरुच्या आऊटर रिंग रोड परिसरामध्ये विस्तार करणे हे आमचे एक धोरणात्मक पाऊल आहे. या भागात भविष्यात मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक मागणी वाढणार आहे. प्रेस्टिज ग्रुपसोबतच्या आमच्या भागीदीमुळे आम्ही अशा बाजारपेठेत जागतिक दर्ज्याची कार्यक्षेत्रे आणत आहोत. या कार्यक्षेत्रांच्या उभारणीमुळे बाजारपेठ ही जागतिक क्षमता केंद्रे आणि कॉर्पोरेट ग्राहकांना मोठ्या प्रमाणात आकर्षित करते. याव्यतिरिक्त उत्पादन आणि किरकोळ विक्री क्षेत्रात काम करणा-या एआय-आधारित जागतिक क्षमता केंद्रांकडून आम्हांला मोठी मागणी दिसून येत आहे. या नवीन विस्तारामुळे आमची क्षमता अधिक मजबूत होईल. आम्ही ग्राहकांना उच्च दर्ज्याचे, लवचिक आणि विकासानुकूल कार्यक्षम वातावरण देण्यास तयार आहोत.”

या भागीदारीबद्दल बोलताना प्रेस्टिज ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कार्यकारी संचालक श्री. जुगी मारवाडा म्हणाले, “बंगळुरुच्या आऊटर रिंग रोडवरील आमच्या प्रीमियम व्यावसायिक प्रकल्पांसाठी देवएक्ससोबत भागीदारी करताना आम्हांला आनंद होत आहे. प्रेस्टिज ग्रुपमध्ये आम्ही नेहमीच जागतिक कंपन्यांच्या बदलत्या गरजा पूर्ण करणा-या दर्जेदार आणि शाश्वत ग्रेड ए+ कार्यक्षेत्रांची निर्मिती करण्यावर भर दिला आहे. देव एक्स कंपनी ही इतर कंपन्यांच्या गरजांवर काम करण्याची पद्धत पाहता तसेच त्यांचा व्यावसायिक अनुभव हा आमच्या प्रेस्टिज लेकेशोर ड्राईव्ह व प्रेस्टिड फेदरलाईट टेक हब या दोन्ही प्रकल्पांच्या उद्दिष्टांशी तंतोतंत जुळणारा आहे. बंगळुरुच्या महत्त्वाच्या भागात आधुनिक आणि भविष्यासाठी सुसज्ज कार्यक्षेत्रे शोधणा-या कंपन्यांसाठी ही भागीदारी मैलाचा दगड ठरेल. यामुळे आमच्या या दोन्ही प्रकल्पांचे मूल्य वाढेल, असा आम्हांला ठाम विश्वास आहे.”

आऊटर रिंग रोडवर मोक्याच्या ठिकाणी जागा मिळवल्यामुळे आशियातील सर्वात मोठ्या आयटी कॉरिडॉरपैकी एका भागात देवएक्स कंपनीचे स्थान भक्कम झाले आहे. या दोन नवीन मालमत्तांच्या संपादनांमुळे जागतिक क्षमता केंद्रांच्या वाढीसह मोठ्या कंपन्यांमधील सहज उपलब्ध होणारी तसेच आंतरराष्ट्रीय दर्ज्याची कार्यक्षेत्रांची वाढती मागणी पूर्ण होणार आहे. ही दुहेरी खरेदी आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्थांच्या आधुनिक गरजांना लक्षात ठेवून तयार करण्यात आली आहे. या भागात व्यवसाय विस्तार करु इच्छिणा-या मोठ्या कॉर्पोरेट ग्राहकांसाठी आता उत्तम पर्याय उपलब्ध होतील.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande