भारतीय क्रिकेट संघाच्या न्यूझीलंड दौऱ्याची घोषणा
-भारतीय क्रिकेट संघाचा ऑक्टोबर ते डिसेंबरपर्यंत न्यूझीलंड दौरा -पाच एकदिवसीय, पाच टी-२० आंतरराष्ट्रीय आणि दोन कसोटी सामने खेळणार नवी दिल्ली, 03 जून (हिं.स.) - भारतीय क्रिकेट संघाच्या न्यूझीलंड दौऱ्याची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय संघ ऑक्टोबर-
बीसीसीआय


-भारतीय क्रिकेट संघाचा ऑक्टोबर ते डिसेंबरपर्यंत न्यूझीलंड दौरा

-पाच एकदिवसीय, पाच टी-२० आंतरराष्ट्रीय आणि दोन कसोटी सामने खेळणार

नवी दिल्ली, 03 जून (हिं.स.) - भारतीय क्रिकेट संघाच्या न्यूझीलंड दौऱ्याची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय संघ ऑक्टोबर-डिसेंबर २०२६ दरम्यान न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार असून, या दौऱ्यात पाच टी-२०, पाच एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळले जातील. एकूण ४१ दिवसांत १२ सामने खेळले जातील. हा भारताचा आतापर्यंतचा न्यूझीलंडमधील सर्वात मोठा दौरा असल्याचे म्हटले जात आहे. या दौऱ्यासाठीचे वेळापत्रक, ठिकाणे आणि सामन्यांचा संपूर्ण तपशील जाहीर करण्यात आला आहेे. दोन्ही संघांमधील सामने २२ ऑक्टोबर ते १ डिसेंबर दरम्यान खेळले जातील. सुरुवातीला भारत आणि न्यूझीलंड यांच्यात केवळ तीन एकदिवसीय सामने नियोजित होते, पण आता ही संख्या वाढवून पाच करण्यात आली आहे.

२०२० नंतर प्रथमच भारतीय संघ सर्व फॉरमॅटच्या मालिकेसाठी न्यूझीलंडचा दौरा करणार आहे. यापूर्वी जेव्हा भारतीय संघाने या देशाचा दौरा केला होता, तेव्हा त्यांनी पाच टी-२०, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळले होते. त्यांनी टी-२० मालिका जिंकली, तर न्यूझीलंडने एकदिवसीय आणि कसोटी मालिका जिंकली. त्यानंतर भारताने २०२२ मध्ये न्यूझीलंडचा दौरा केला, पण त्या दौऱ्यात केवळ एकदिवसीय आणि टी-२० सामन्यांचा समावेश होता.

भारताच्या न्यूझीलंड दौऱ्याची सुरुवात २२ ऑक्टोबर रोजी क्राइस्टचर्च येथे एका टी-२० सामन्याने होईल. ही मालिका १ नोव्हेंबरपर्यंत चालेल आणि अंतिम टी-२० सामना हॅमिल्टन येथे होईल. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांची एकदिवसीय मालिका ४ नोव्हेंबर रोजी ऑकलंडमध्ये सुरू होईल आणि अंतिम सामना १५ नोव्हेंबर रोजी माउंट माउंगानुई येथे होईल. त्यानंतर कसोटी मालिका होईल. पहिली कसोटी १९ ते २३ नोव्हेंबर दरम्यान वेलिंग्टनमध्ये होणार आहे. अंतिम कसोटी २७ नोव्हेंबरपासून क्राइस्टचर्चमध्ये खेळवली जाईल. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सर्व सामने पाच प्रमुख केंद्रांवर खेळले जातील.

भारतीय संघ आपल्या न्यूझीलंड दौऱ्यात क्राइस्टचर्च, वेलिंग्टन, ऑकलंड, हॅमिल्टन आणि टॉरंगा येथे सामने खेळेल. टी-२० मालिकेतील पहिले दोन सामने क्राइस्टचर्चमध्ये खेळले जातील, त्यानंतर वेलिंग्टन, ऑकलंड आणि हॅमिल्टन येथे सामने होतील. एकदिवसीय मालिका ऑकलंडमध्ये सुरू होईल, त्यानंतर वेलिंग्टन आणि हॅमिल्टन येथे सामने होतील आणि शेवटचे दोन सामने टॉरंगा येथे खेळले जातील. पहिला कसोटी सामना वेलिंग्टनमध्ये आणि दुसरा क्राइस्टचर्चमध्ये होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande