
छत्रपती संभाजीनगर, 30 जून (हिं.स.)।
मोबाईल दुकानात चोरट्यांचा धुमाकूळ,शटर उचकटून ३६ मोबाईल हॅण्डसेट लंपास करण्यात आले
टीव्ही सेंटर परिसरातील घटना,CCTV कॅमेरात कैद झाली आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरातील टीव्ही सेंटर परिसरातील संजय गांधी मार्केटमधील एका मोबाईल दुकानात चोरट्यांनी मध्यरात्री धाडसी चोरी केली आहे. दुकानाचे शटर उचकटून तब्बल ३६ मोबाईल हॅण्डसेट चोरून नेण्यात आले असून, चोरीचा हा प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. या घटनेत सुमारे ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे. सुरेवाडी येथील रहिवासी चेतन नारायण चव्हाण यांचे हे दुकान असून, चोरट्यांनी १६ लावा आणि २० आयटेल कंपनीचे मोबाईल हॅण्डसेट चोरून नेले आहेत. या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील तपास करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis