लासलगाव - विद्युत पोलला लागून बसल्याने युवकाचा मृत्यू
लासलगाव, 30 जून, (हिं.स.)। एनव्हीपी महाविद्यालयाच्या मैदानावर सरावासाठी आलेल्या २४ वर्षीय युवकाचा मैदानावरील विद्युत पोलला टेकल्यानंतर विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना दि २९ रोजी सकाळी घडली. या घटनेमुळे विद्यार्थी व नागरिकांमध्ये
लासलगाव - विद्युत पोलला लागून बसल्याने युवकाचा मृत्यू


लासलगाव, 30 जून, (हिं.स.)। एनव्हीपी महाविद्यालयाच्या मैदानावर सरावासाठी आलेल्या २४ वर्षीय युवकाचा मैदानावरील विद्युत पोलला टेकल्यानंतर विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना दि २९ रोजी सकाळी घडली. या घटनेमुळे विद्यार्थी व नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे

मिळालेल्या माहितीनुसार, राहुल मधुकर अंडगुळे (वय २४) रा.लौकि ता येवला हा नेहमीप्रमाणे सकाळी सुमारे ९.१५ वाजता एनव्हीपी महाविद्यालयाच्या मैदानावर सरावासाठी आला होता. सराव पूर्ण झाल्यानंतर तो मैदानावरील इलेक्ट्रिक पोलला पाठ लावून बसला असता अचानक त्याला विजेचा जोरदार धक्का बसला. उपस्थितांनी त्याला तत्काळ उपचारासाठी लासलगाव येथील खाजगी रुग्णालयामध्ये दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.

याप्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू (ए.डी.) क्र. ३८/२०२६ अशी नोंद करण्यात आली असून, लासलगाव पोलीस पुढील तपास करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande