कुंभ पर्वाच्या नावावरती बसने केला 15 अधिकाऱ्यांनी दौरा
स्वतःचे कौतुक करून घेण्यासाठी केले फोटोसेशन नाशिक, 05 जून (हिं.स.)। - इंधन बचतीचा संदेश देण्याच्या नावाखाली 55 सीट असलेली क्षमतेची बस फक्त पंधरा लोकांसाठी वापरण्यात आली आणि जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी आपली स्वतःची पाठ शाबासकीने थापडुन जे
15 officials visited the


स्वतःचे कौतुक करून घेण्यासाठी केले फोटोसेशन

नाशिक, 05 जून (हिं.स.)।

- इंधन बचतीचा संदेश देण्याच्या नावाखाली 55 सीट असलेली क्षमतेची बस फक्त पंधरा लोकांसाठी वापरण्यात आली आणि जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी आपली स्वतःची पाठ शाबासकीने थापडुन जे दिवे ओवाळले ते बघितले तर यापेक्षा स्वतःची गाडी घेऊन गेलेले परवडले असते म्हणजेच काय ते धरला तर चावत आणि सोडलं तर पळत असा प्रकार जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केला आहे.

नाशिक मध्ये दर बारा वर्षांनी भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्याने विविध विकास काम सुरू आहे या विकास कामांसाठी म्हणून मोठ्या प्रमाणावर ती निधी देखील आलेला आहे आणि काम सुरू आहेत असं असतानाही शहरातील नागरी खड्ड्यांमुळे त्रस्त आहेत अलीकडच्या काळामध्ये तर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीचा संदेश दिलेला आहे पण हा संदेश कसा पाळावा कसा पळू नये यावरती प्रशासकीय अधिकारी आपल्या सोयी सोयीने निर्णय घेतात हे देखील नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या निमित्याने समोर आले आहे. निमित्य होतं रस्ते वाहतूक आणि सुखसोयी यांच्या नियोजनाबाबत त्यासाठी म्हणून गुरुवारी एका प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या दौऱ्याचे नियोजन करण्यात आले होते. या दौऱ्यात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक (नाशिक ग्रामीण) डॉ. डी. एस. स्वामी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे, एसटी महामंडळाचे विभागीय वाहतूक अधिकारी किरण भोसले प्रामुख्याने सहभागी झाले होते.

देशाच्या प्रधानमंत्र्यांनीच सांगितल्यामुळे इंधन बचत झाली पाहिजे म्हणून या पाच अधिकारींनी आपल्या बगलबच्चे म्हणजेच मदतीसाठी असणाऱ्या अधिकाऱ्यांना घेऊन स्वतःच्या वाहनाने प्रवेश करण्यापेक्षा नाशिक महानगरपालिकेची असलेल्या सिटीलींक या बस सेवेचा वापर करण्याचा निर्णय घेतला तसं म्हणाल तर हा निर्णय स्वागत तरी आहे परंतु या निर्णयाकडे बघितलं तर या अधिकाऱ्यांनी गाड्या वापरल्या असत्या तर ते योग्य झालं असतं अशी म्हणायची पाळी फोटोतील दृश्यावरून समोर येत आहे त्याचं झालं असं की महानगरपालिकेच्या सिटी म्हणजे परिवहन बस सेवेची सीएनजी बस घेऊन हे अधिकारी दौऱ्यावर निघाले या बसची क्षमता आहे 55 सिटची उभे राहिले तर अजून दहा सीट वाढतात पण सर्व परिस्थिती बघून बस घेतली असती आणि तेवढे अधिकारी जर दौऱ्यावरती केले असते किंवा अर्धे तरी गेले असते तर हा दौरा बस ने केला हे म्हणणे योग्य ठरले असते पण या दौऱ्याचा छायाचित्र बघितलं तर अवघ्या पंधरा व्यक्तींसाठी महानगरपालिकेच्या सिटीलिंक बस सेवेचा वापर करण्यात आला आणि त्या माध्यमातून हा पाहणी दौरा करण्यात आला. नेहमी आपल्या सुरक्षारक्षकांसह वावरणाऱ्या अधिकाऱ्यांची सुरक्षारक्षक या बस मध्ये दिसत नाही म्हणजेच मग सुरक्षारक्षकांविना या अधिकाऱ्यांनी दौरा केला का असेही म्हणायचे पाळी फोटो वरून दिसत आहे . असो या अधिकाऱ्यांनी खुद्द देशाच्या पंतप्रधानांचा आदेश मांडला आणि एकत्रित दौरा केला पण मात्र ज्या शहरांमध्ये सर्वसामान्य लोकांना सीएनजी गॅसच मिळत नाही त्यांचे वाहन उभी आहेत अशा सीएनजी बसमध्ये म्हणजेच सिटीलींक बस सेवेमध्ये या अधिकाऱ्यांनी दौरा केला हे कौतुकास्पद असलं तरी यापेक्षा एवढ्या मोजक्या लोकांसाठी स्वतःची वाहन वापरली असती तर ते योग्य ठरलं असतं पण या झालेल्या नुकसानीला कोणी जबाबदार नाही देशाच्या पंतप्रधानांचा आदेश त्याचे पालन आम्ही केले हे फक्त दाखविण्यासाठी हा बोलका फोटोज खूप काही आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande