बीड - बेशिस्त रिक्षा, वाहनचालकांकडून तब्बल १.५ लाखांचा दंड वसूल
बीड, 05 जून (हिं.स.)। रस्त्यावर स्वतःला किंग समजणाऱ्या मुजोर रिक्षाचालकांना आणि वाहतूकचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या बाज वाहनचालकांना वाहतूक पोलिसांनी चांगलाच दणका दिला. पोलिसांनी धडक कारवाई करत अशा चालकांकडून तब्बल १.५ लाखांचा दंड वसूल केला. स्टाइलब
बीड - बेशिस्त रिक्षा, वाहनचालकांकडून तब्बल १.५ लाखांचा दंड वसूल


बीड, 05 जून (हिं.स.)। रस्त्यावर स्वतःला किंग समजणाऱ्या मुजोर रिक्षाचालकांना आणि वाहतूकचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या बाज वाहनचालकांना वाहतूक पोलिसांनी चांगलाच दणका दिला. पोलिसांनी धडक कारवाई करत अशा चालकांकडून तब्बल १.५ लाखांचा दंड वसूल केला.

स्टाइलबाज नेहमी रस्त्याच्या मध्यभागी रिक्षा उभी करणे, भाडे नाकारणे आणि प्रवाशांशी हुज्जत घालणे, ही काही रिक्षाचालकांची नेहमीचीच सवय आहे. त्यामुळे पोलिसांनी अशा चालकांना फक्त दंडच केला नाही, तर ऑन द स्पॉट वाहतुकीचे नियम समजावून सांगत त्यांची शाळा घेतली. काही बहाद्दरांनी नेहमीप्रमाणे ओळख काढण्याचा प्रयत्न केला. पण, पोलिसांच्या कडक भूमिकेपुढे कोणाचेच काही चालले नाही. अवघ्या काही तासांतच नियम तोडणाऱ्यांच्या खिशातून दीड लाखांचा महसूल सरकारी तिजोरीत जमा झाला.

दरम्यान, काही मुजोर रिक्षाचालक आणि बेशिस्त वाहनचालकांमुळे वाहतूक कोंडीत भर पडत असल्याच्या तक्रारी येत होत्या. त्यामुळेच आम्ही ही विशेष मोहीम हाती घेतली. केवळ दंड वसूल करणे हा आमचा उद्देश नसून, वाहनचालकांमध्ये शिस्त निर्माण करणे हा मुख्य हेतू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande