अपघातात पती-पत्नी यांचा मृत्यू, अवघ्या काही तासात आरोपी अटक
अकोला, 05 जून (हिं.स.)। मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या पती-पत्नीचा पहाटे पाच वाजेच्या सुमारास अकोला-दर्यापूर मार्गावरील खरप जवळ झालेल्या भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला. ट्रक चालकावर कारवाई करण्यासाठी संतप्त ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून ''रास्ता
Photo


अकोला, 05 जून (हिं.स.)।

मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या पती-पत्नीचा पहाटे पाच वाजेच्या सुमारास अकोला-दर्यापूर मार्गावरील खरप जवळ झालेल्या भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला. ट्रक चालकावर कारवाई करण्यासाठी संतप्त ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून 'रास्ता रोको' आंदोलन केले होते. सिव्हिल लाईन पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तात्काळ कारवाई करत अवघ्या काही तासात दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खरप बुद्रुक येथील रहिवासी विजय पांडुरंग इंगळे व त्यांची पत्नी प्रतिभा विजय इंगळे हे दोघे दुचाकीवरून जात होते. दरम्यान भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही टक्कर इतकी भीषण होती की, दोघेही 5 ते 10 फूट अंतरावर फेकल्या गेले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ जमा झाले आणि त्यांनी आरोपी चालकाला तात्काळ अटक करण्याची मागणी करत रास्ता रोको आंदोलन केले. पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून आरोपी ड्राइवर सूरजसिंग रामेदसिंग वय ३० राहणार बालचिनी जिल्हा मुरेना, भगवानदास मारासिंग जाठव वय ५० वर्ष राहणार मुगाबली जिल्हा मुरेना राज्य मध्य प्रदेश यांना व ट्रॅक क्रमांक RJ 11 GB 0492 जमा करण्यात आले आहे. सदरची कारवाई ही पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पुलिस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी, शहर उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटील व पथकाने केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande