
अकोला, 05 जून (हिं.स.)।
अकोल्यात मुख्य बाजारपेठेत वाढलेल्या अतिक्रमणामुळे सामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.. काल अकोल्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गांधी चौकात एका महिलेला एका अतिक्रमण धारकाने किरकोळ कारणावरून पाईप ने मारहाण केल्याची घटना घडली होती.. यावरून आता बजरंग दल आक्रमक झाली असून मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमण हटविण्याची मागणी करीत बजरंग दलाच्या वतीने अकोला महापालिका परिसरात आंदोलन करण्यात आलं.. यावेळी आयुक्त यांना निवेदन देऊन अतिक्रमण हटविण्याची मागणी करण्यात आली आहे.. बजरंग दलाकडून देण्यात आलेल्या निवेदनात चौपाटी जवळील एका विशिष्ट धर्माच्या अतिक्रमणधारकाने क्षुल्लक कारणावरून एका हिंदू महिलेवर जीवघेणा हल्ला करून तिला व तिच्या नवऱ्याला पाईपाने मारहाण केली तिच्या हातातील अंगठी व सोन्याचे मंगळसूत्र सुद्धा हिसकावून घेतले, त्या महिलेचे ब्लाउज पकडून तिला ओढतान केली, तिला अश्लील भाषेत शिवीगाळ केली, त्या महिलेचा विनयभंग केला, त्या महिलेला अपमानित केले. झालेला प्रकार हा अतिशय निंदनीय आहे व त्या ठिकाणी नेहमीच काही अतिक्रमण धारक दादागिरी करत असतात, अनेक लोकांना मारहाण सुद्धा करतात..त्यामुळे येथील अतिक्रमण हटविणे आवश्यक असून तसे न केल्यास शहरातील हिंदू युवक, हिंदू संघटना स्वतःहून हे सर्व अतिक्रमण हटवतील तेव्हा निर्माण झालेल्या सर्व परिस्थितीला सर्वस्वी मनपायुक्त जबाबदार राहाल असा इशारा महापालिका प्रशासनाला बजरंग दलाने दिला आहे..
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे