
अकोला, 05 जून (हिं.स.)।
जनगणना – 2027 अंतर्गत अकोला महानगरपालिका व्दारा सुरू असलेल्या जनगणनेच्या कामाबाबत जिल्हा समन्वयक कार्तिक गडलिंग यांच्याव्दारे आढावा बैठक घेण्यात आली.
या बैठकीमध्ये पुर्व, दक्षिण आणि उत्तर झोन अंतर्गत सुरू असलेल्या जनगणेच्या कामाचा पर्यवेक्षकांकडून आढावा घेण्यात आला, तसेच 14 जून 2026 रोजी पर्यंतच्या करावयाच्या कामाबाबत माहिती देऊन या संदर्भात अचूक माहिती भरणे संदर्भात सुचना देण्यात आल्या.
यावेळी सहा.आयुक्त तथा पुर्व झोन चार्ज अधिकारी राजेश सरप, अतिरिक्त चार्ज अधिकारी तथा जी.आय.एस.विभाग प्रमुख चंदन प्रसाद, सिस्टीम मॅनेजर तथा अतिरिक्त चार्ज अधिकारी हीरा मनवर, तांत्रिक सहायक आकार पहुरकर यांचेसह तिन्ही झोनचे पर्यवेक्षकांची उपस्थिती होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे