पावसाळ्याच्या आगमनाची चाहूल लागताच बाजारात जांभळांची आवक वाढली
नांदेड, 05 जून (हिं.स.)। उन्हाळ्याचा शेवट आणि पावसाळ्याच्या आगमनाची चाहूल लागताच बाजारात जांभळांची आवक वाढू लागली आहे. शहरात मागील काही दिवसांपासून रस्त्यांवर, चौकांमध्ये तसेच भाजी बाजार परिसरात जांभूळ विक्रेते दिसून येत आहेत. सध्या जांभूळ ३०० रुपय
पावसाळ्याच्या आगमनाची चाहूल लागताच बाजारात जांभळांची आवक वाढली


नांदेड, 05 जून (हिं.स.)। उन्हाळ्याचा शेवट आणि पावसाळ्याच्या आगमनाची चाहूल लागताच बाजारात जांभळांची आवक वाढू लागली आहे. शहरात मागील काही दिवसांपासून रस्त्यांवर, चौकांमध्ये तसेच भाजी बाजार परिसरात जांभूळ विक्रेते दिसून येत आहेत. सध्या जांभूळ ३०० रुपये किलो दराने विकले जात असून, ग्राहकांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

काळसर-जांभळ्या रंगाचे आणि आंबट-गोड चवीचे हे हंगामी फळ केवळ चविष्टच नाही, तर आरोग्यासाठीही अत्यंत लाभदायक मानले जाते. विशेषतः मधुमेह नियंत्रण, पचनसंस्थेचे आरोग्य आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी जांभूळ उपयुक्त असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

जांभळामध्ये आढळणारे जॅम्बोलिन आणि जॅम्बोसीन हे घटक रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी जांभूळ फायदेशीर ठरते.

पचनशक्ती सुधारते: जांभळातील

तंतूमय पदार्थ (फायबर) पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करतात. अपचन, गॅस आणि बद्धकोष्ठता यांसारख्या समस्यांमध्येही ते उपयुक्त ठरते.

आंबट-गोड चवीच्या जांभळांची बाजारपेठेत आवक वाढली असून, जागोजागी रस्त्यावर जांभळांच्या हातगाड्या दिसून येत आहेत.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande