डोंबिवलीत भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा आ. रविंद्र चव्हाण यांनी केले वृक्षारोपण
डोंबिवली, 5 जून, (हिं.स.)। धरतीला आपण माता मानतो. मातेचं ऋण फेडलं जात नाही तर तिची सेवा केली जाते. याच भावनेतून डोंबिवलीतील वै.ह.भ. प. संत सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात भाजपा प्र
Ph1


डोंबिवली, 5 जून, (हिं.स.)। धरतीला आपण माता मानतो. मातेचं ऋण फेडलं जात नाही तर तिची सेवा केली जाते. याच भावनेतून डोंबिवलीतील वै.ह.भ. प. संत सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रविंद्र चव्हाण यांनी वृक्षारोपण केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या एक पेड़ माँ के नाम या आवाहनानुसार, जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून भाजपा डोंबिवली पूर्व शहर यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमा दरम्यान गेल्या वर्षी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून लावण्यात आलेल्या झाडासोबत भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सेल्फी घेतला. यावेळी भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब, कल्याण डोंबिवली महानगरपालिका भाजपा गटनेते शशिकांत कांबळे, शिक्षण समिती सभापती अभिजीत थरवळ, भाजपा डोंबिवली पूर्व मंडल अध्यक्ष मितेश पेणकर, नगरसेविका रंजनाताई पेणकर, नगरसेवक दिपेश म्हात्रे, नगरसेवक महेश पाटील, नगरसेवक नंदू म्हात्रे, नगरसेवक विनोद काळण, नगरसेवक मंदार टावरे, नगरसेवक जालिंदर पाटील यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोठागाव बॅकवॉटर परिसरात वृक्षारोपण :

माजी स्थायी समिती सभापती तथा भाजपा नगरसेवक दीपेश पुंडलिक म्हात्रे यांनी जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या अधिकाधिक वृक्ष लागवड करा या संदेशाला प्रतिसाद देत मोठागाव येथील बॅकवॉटर परिसरात वृक्षारोपण केले. यावेळी त्यांनी सांगितले की, पर्यावरणाचे संरक्षण, वाढते तापमान नियंत्रणात ठेवणे, स्वच्छ हवा व अधिक प्राणवायू उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. प्रत्येकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करणे हीच पर्यावरण दिनाची खरी शिकवण आहे.

जुनी डोंबिवली गणेश घाट परिसर वृक्षारोपण :

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी जुनी डोंबिवली मंडल माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणादायी एक पेड माँ के नाम या संकल्पनेतून वृक्षारोपण करण्यात आले. भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षामार्फत राज्यभर राबविण्यात येत असलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमात आम्ही सर्व जण या अभियानात सहभागी होऊन सर्वांनी पर्यावरण संरक्षणाचा संकल्प हाती घेतला आहे. आई जसे आपल्या लेकरांचे संगोपन करते, त्याचप्रमाणे वृक्षही मानवजातीचे संरक्षण करत जीवनाला आधार देतात. आईप्रती कृतज्ञता व्यक्त करताना पर्यावरण संवर्धनाची जबाबदारीही पार पाडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे असे नगरसेविका तथा शिक्षण समिती सदस्या रसिका कृष्णा पाटील व.भाजपा डोंबिवली पश्चिम मंडल उपाध्यक्ष कृष्णा बाळाराम पाटील यांनी सांगितले. यावेळी नगरसेविका हर्षदा हृदयनाथ भोईर, माजी नगरसेवक हृदयनाथ सुदाम भोईर, मंडल सरचिटणीस हर्षद सुर्वे, युवा मोर्चा अध्यक्ष सुजय विचारे, सरचिटणीस चंदन गुराम, गणेश कदम, बाळा परब तसेच पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

----------------

हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi


 rajesh pande