भारत जोडो युवा अकादमी, राष्ट्र सेवा दलाचा उपक्रम; मुलींची लक्षणीय उपस्थिती, पालक सहभागी
नांदेड, 05 जून (हिं.स.)। भारत जोडो युवा अकादमी आणि राष्ट्र सेवा दल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विज्ञान, साहस व छंद शिबिराला साने गुरुजी इमर्जन्सी अॅण्ड मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, एमआयडीसी, कोठारी (ता. किनवट) येथे सुरवात झाली. या शिबिरात पुणे,
भारत जोडो युवा अकादमी, राष्ट्र सेवा दलाचा उपक्रम; मुलींची लक्षणीय उपस्थिती, पालक सहभागी


नांदेड, 05 जून (हिं.स.)।

भारत जोडो युवा अकादमी आणि राष्ट्र सेवा दल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विज्ञान, साहस व छंद शिबिराला साने गुरुजी इमर्जन्सी अॅण्ड मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, एमआयडीसी, कोठारी (ता. किनवट) येथे सुरवात झाली. या शिबिरात पुणे, जालना, लातूर, वर्धा, यवतमाळ, माहूर, हदगाव आणि किनवट परिसरातील १४४ विद्यार्थी सहभागी झाले असून, मुलींची लक्षणीय उपस्थिती व पालकांचा सक्रिय सहभाग विशेष लक्षवेधी ठरला आहे.

कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रीय ध्वजवंदन सीमा सरपोतदार यांच्या हस्ते करण्यात आले, तर राष्ट्र सेवा दलाचा ध्वज शिबिरार्थी पालक उमेश कुरसंगे यांच्या हस्ते फडकावण्यात आला. त्यानंतर प्रार्थना आणि साने गुरुजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण

करून उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्रा. रामप्रसाद तौर होते. यावेळी प्रकल्प संचालक तथा बालरोगतज्ज्ञ डॉ. योगेंद्र वरटकर यांनी त्यांचा सत्कार केला. तसेच शिबिर प्रमुख व राष्ट्र सेवा दलाचे पूर्णवेळ कार्यकर्ते सदाशिव मकदूम यांचा डॉ. भाग्यश्री बेलखोडे-वरटकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. सहप्रशिक्षक शौर्य भोसले, नागिनी दुल्ले, कोमल मकदुम आणि सीमा सरपोतदार यांचाही सत्कार करण्यात आला.

प्रास्ताविकात भारत जोडो युवा अकादमीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अशोक बेलखोडे यांनी शिबिराच्या उद्दिष्टांवर प्रकाश टाकला. विज्ञाननिष्ठ, संवेदनशील आणि जबाबदार नागरिक घडविण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी सांगितले, की अनेक वर्षांपासून आयोजित

करण्यात येणाऱ्या या शिबिरांमधून घडलेले विद्यार्थी आज विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करत आहेत. शिविर प्रमुख सदाशिव मकदुम यांनी राष्ट्र सेवा दलाच्या कार्याची माहिती देताना लोकशाही, सामाजिक समता,

वैज्ञानिक दृष्टिकोन आणि राष्ट्रीय एकात्मता या मूल्यांच्या जपणुकीसाठी संघटना सातत्याने कार्यरत असल्याचे नमूद केले. शिबिरांमधून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, शिस्त, सेवाभाव आणि आत्मविश्वास विकसित होण्यास

मदत होत असल्याचे त्यांनी सांगितले.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande