रत्नागिरी : पर्यावरण दिनानिमित्त बॉटनिकल गार्डनमधील झाडांचा पहिला वाढदिवस
रत्नागिरी, 5 जून (हिं.स.) । जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून चिपळूणचे आमदार शेखर निकम यांच्या हस्ते चिपळूण तालुक्यातील कळंबस्ते येथील देवराई (दि बॉटनिकल गार्डन) मध्ये आज मोठ्या उत्साहात वृक्षारोपण करण्यात आले. यानिमित्ताने गार्डनमधील झाडांचा पह
बोटॅनिकल गार्डनमधील वृक्षारोपण


बोटॅनिकल गार्डन वृक्षारोपण


रत्नागिरी, 5 जून (हिं.स.) । जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून चिपळूणचे आमदार शेखर निकम यांच्या हस्ते चिपळूण तालुक्यातील कळंबस्ते येथील देवराई (दि बॉटनिकल गार्डन) मध्ये आज मोठ्या उत्साहात वृक्षारोपण करण्यात आले. यानिमित्ताने गार्डनमधील झाडांचा पहिला वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि स्थानिक देवराईचे जतन करण्यासाठी या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ वृक्षारोपण करून न थांबता, विविध शासकीय विभागांचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एकत्र येत देवराईच्या संवर्धनासाठी प्रत्यक्ष श्रमदान केले. यामध्ये महसूल विभाग, कृषी विभाग, चिपळूण नगरपालिका आणि पंचायत समितीचे अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश होता. या सर्वांनी संपूर्ण देवराई परिसराची स्वच्छता व झाडांना गांडूळ खत घालण्याचे काम केले.

या उपक्रमासाठी सहकार्य म्हणून सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील वाटंबरे येथील यशराज गांडूळ खत प्रकल्पाकडून देवराईतील झाडांसाठी १२०० किलो गांडूळ खत मोफत उपलब्ध करून देण्यात आले होते. या उपक्रमामुळे कळंबस्ते देवराईला एक नवे रूप मिळाले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande