
छत्रपती संभाजीनगर, 05 जून (हिं.स.)।
सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था ,पुणे यांच्यामार्फत जी.डी.सी.आणि सी.एच.एम. परीक्षा २०२५ देवगिरी महाविद्यालय येथे ही परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचे गुणपत्रक व प्रमाणपत्र जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला प्राप्त झाले आहेत.
परीक्षार्थींनी आपली गुणपत्रके व प्रमाणपत्रे दिनांक ३० जून २०२६ पर्यंत जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, छत्रपती संभाजीनगर कार्यालयात स्वतः समक्ष हजर राहून हस्तगत करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
यासोबतच, ज्या विद्यार्थ्यांनी सन २०२२, २०२३ व २०२४ मधील परीक्षेचे गुणपत्रक व प्रमाणपत्र अद्याप कार्यालयात येऊन नेलेले नाही, अशा सर्व विद्यार्थ्यांनी देखील तात्काळ कार्यालयात समक्ष येऊन आपली प्रमाणपत्रे हस्तगत करावीत, असे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, छत्रपती संभाजीनगर कार्यालयाने कळविले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis