महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात वृक्षारोपण उत्साहात साजरा
चंद्रपूर, 05 जून, (हिं.स.)। जागतिक पर्यावरण दिना''चे औचित्य साधून आज महावितरणने आपली जमीन, आपले भविष्य'' या मंत्राचा उच्चार करत एका शाश्वत आणि हरित भविष्यासाठी आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे. महाराष्ट्राच्या विकासाची ऊर्जा असलेल्या महावित
महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात वृक्षारोपण उत्साहात साजरा


चंद्रपूर, 05 जून, (हिं.स.)। जागतिक पर्यावरण दिना'चे औचित्य साधून आज महावितरणने आपली जमीन, आपले भविष्य' या मंत्राचा उच्चार करत एका शाश्वत आणि हरित भविष्यासाठी आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे. महाराष्ट्राच्या विकासाची ऊर्जा असलेल्या महावितरणने आता केवळ वीजपुरवठा करण्यापलीकडे जात, पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. 'हरित ऊर्जा, समृद्ध महाराष्ट्र' हे ध्येय गाठण्यासाठी महावितरण आता संपूर्ण क्षमतेने सज्ज झाली आहे.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त (वसूंधरा दिन) महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळ कार्यालयातील परिसरात वृक्षारोपण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता हरिश गजबे यांच्या हस्ते वृक्ष लावून करण्यात आले. यावेळी चंद्रपुर मंडळाचे अधिक्षक अभियंता मनोज धाबर्डे, अधिक्षक अभियंता (पायाभुत आराखडा) रमेश सानप, कार्यकारी अभियंता (स्थापत्य) प्रमोद रागिट, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी विशाल पिपरे, सहाय्यक महाव्यवस्थापक (मा.सं.) असित ढाकणेकर, जनसंपर्क अधिकारी यांच्यासह अधिकारी, आभियंते व कर्मचारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande