नांदेड - ३२६ पात्र लाभार्थीना प्रत्येकी पाच ब्रास वाळू; वितरण सुरू
नांदेड, 5 जून, (हिं.स.) - उमरी तालुक्यातील लाभार्थीना घरकुल बांधण्यासाठी आवश्यक असलेली वाळू सहज उपलब्ध व्हावी, या उद्देशाने प्रशासनाच्या वतीने मोफत वाळू वितरणास सुरवात करण्यात आली आहे. कौडगाव आणि येंडाळा येथील वाळू घाटांमधून पात्र लाभार्थीना वाळूचे
नांदेड - ३२६ पात्र लाभार्थीना प्रत्येकी पाच ब्रास वाळू; वितरण सुरू


नांदेड, 5 जून, (हिं.स.) - उमरी तालुक्यातील लाभार्थीना घरकुल बांधण्यासाठी आवश्यक असलेली वाळू सहज उपलब्ध व्हावी, या उद्देशाने प्रशासनाच्या वतीने मोफत वाळू वितरणास सुरवात करण्यात आली आहे. कौडगाव आणि येंडाळा येथील वाळू घाटांमधून पात्र लाभार्थीना वाळूचे वितरण सुरू केले आहे.

शासनाच्या विविध घरकुल योजनांअंतर्गत लाभ मिळालेल्या प्रत्येक पात्र लाभार्थीला घर बांधण्यासाठी पाच ब्रास वाळू निःशुल्क उपलब्ध करून देण्यात येत आहे. नगर परिषद उमरीकडून प्राप्त शहरी भागातील १०९ तसेच पंचायत समिती उमरीमार्फत प्राप्त ग्रामीण भागातील २१७अशा एकूण ३२६ पात्र घरकुल लाभार्थीना या योजनेचा लाभ दिला जात आहे. यासंदर्भात तहसीलदार मंजूषा भगत यांनी तालुक्यातील सर्व पात्र घरकुल लाभार्थीना या सुविधेचा लाभघ्यावा, असे आवाहन केले आहे. मोफत वाळू उपलब्ध झाल्यामुळे घरबांधणीचा खर्च कमी होण्यास मदत होणार असून, वाळूअभावी रखडलेल्या अनेक घरकुलांच्या कामांना गती मिळणार आहे. तसेच लाभार्थीचे स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande