छ.संभाजीनगर शहरातील पाणी प्रक्रिया, एरिएशन, क्लोरिनेशन व फिल्ट्रेशन प्रकल्पांची पाहणी
छत्रपती संभाजीनगर, 05 जून (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर शहराला १२ जूनपर्यंत वाढीव पाणीपुरवठा सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त श्री. जी. श्रीकांत (भा.प्र.से.) यांनी नक्षत्रवाडी येथील ३९२ दशलक्ष लिटर क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी
छ.संभाजीनगर शहरातील पाणी प्रक्रिया, एरिएशन, क्लोरिनेशन व फिल्ट्रेशन प्रकल्पांची पाहणी


छत्रपती संभाजीनगर, 05 जून (हिं.स.)।

छत्रपती संभाजीनगर शहराला १२ जूनपर्यंत वाढीव पाणीपुरवठा सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त श्री. जी. श्रीकांत (भा.प्र.से.) यांनी नक्षत्रवाडी येथील ३९२ दशलक्ष लिटर क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी करून आढावा बैठक घेतली. बैठकीत उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. पाणी प्रक्रिया, एरिएशन, क्लोरिनेशन व फिल्ट्रेशन प्रकल्पांची पाहणी करण्यात आली.

तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने दररोज कामांची देखरेख ठेवून नियमित प्रगती अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी व कंत्राटदार कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande