
छत्रपती संभाजीनगर, 05 जून (हिं.स.)।
सीएसएमआरडीए अंतर्गत समाविष्ट गावांचा आणि झालर क्षेत्राचा नियोजनबद्ध व शाश्वत विकास करण्यासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने काम करावे, असे निर्देश प्राधिकरणाचे आयुक्त तथा विभागीय आयुक्त श्री. जी. श्रीकांत (भा.प्र.से.) यांनी आढावा बैठकीत दिले.
विभागीय आयुक्त कार्यालय, छत्रपती संभाजीनगर विभाग या बैठकीत विकास नियोजन, विभागनिहाय समन्वय आणि पुढील कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला.
बैठकीस जिल्हाधिकारी श्री. विनय गौडा, मनपा आयुक्त श्री. अमोल येडगे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis