
डोंबिवली, 05 जून (हिं.स.)।
भाजप शिष्टमंडळाने महावितरण डोंबिवली अर्बन डिव्हिजनचे एक्झिक्यूटिव्ह इंजिनिअर काळे यांची भेट घेत डोंबिवली मधील वारंवार जाणाऱ्या लाईट आणि त्यामुळे त्रस्त नागरिकांचे प्रश्न काळे यांच्यासमोर मांडण्यात आले. परिणामी सविस्तर माहिती घेऊन नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल महावितरण कंपनीने वीज पुरवठा सुरळीतपणे चालू ठेवावा असे शिष्टमंडळ प्रतिनिधींमार्फत सांगण्यात आले.
चर्चेच्या दरम्यान असा इशारा देण्यात आला की, जर विजेचा लंपडाव सुरु राहिला तर भारतीय जनता पार्टीची ताकद महावितरण कंपनीला दाखवण्यात येईल. यावेळी भाजपा गटनेते शशिकांत कांबळे, नगरसेवक दीपेश म्हात्रे, समीर चिटणीस, माजी नगरसेवक हृदयनाथ भोईर, राहुल श्रीधर म्हात्रे, कल्याण जिल्हा वाहतूक आघाडी अध्यक्ष दत्ता माळेकर, पश्चिम मंडळाध्यक्ष प्रिया जोशी तसेच भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्ते उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi