पुणे - नालेसफाईतील अनियमिततेप्रकरणी सहा अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस
पुणे, 05 जून, (हिं.स.)। मान्सूनपूर्व नालेसफाई आणि कल्व्हर्टच्या कामांमध्ये अनियमितता आढळून आल्याने पुणे महापालिकेने दोन क्षेत्रीय कार्यालयांच्या सहायक आयुक्तांसह सहा अधिकाऱ्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रजित ना
पुणे - नालेसफाईतील अनियमिततेप्रकरणी सहा अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस


पुणे, 05 जून, (हिं.स.)। मान्सूनपूर्व नालेसफाई आणि कल्व्हर्टच्या कामांमध्ये अनियमितता आढळून आल्याने पुणे महापालिकेने दोन क्षेत्रीय कार्यालयांच्या सहायक आयुक्तांसह सहा अधिकाऱ्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांनी ही कारवाई केली. विश्रामबागवाडा आणि कसबा पेठ क्षेत्रीय कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांचा या कारवाईत समावेश आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नालेसफाई, कल्व्हर्ट आणि जलनिस्सारण व्यवस्थेची कामे वेळेत व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे.

येत्या आठवड्यापासून विविध क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील नाले आणि कल्व्हर्टच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात येणार असून, कामांची गुणवत्ता व प्रगतीची तपासणी केली जाणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांनी दिली.शहरातील मान्सूनपूर्व नालेसफाई, कल्व्हर्ट आणि जलनिस्सारण व्यवस्थेशी संबंधित कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी अतिरिक्त आयुक्त नायर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.

या बैठकीस परिमंडळ उपायुक्त माधव जगताप, विजयकुमार थोरात, अविनाश सकपाळ, अरविंद माळी, उपायुक्त आशा राऊत, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त गणेश सोनुने तसेच सर्व क्षेत्रीय कार्यालयांचे सहायक आयुक्त आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.बैठकीत विविध कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला असून, मान्सूनपूर्व तयारीत कोणतीही हलगर्जीपणा सहन केला जाणार नसल्याचा स्पष्ट इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande