नाशिक - नंदिनी नदी स्वच्छता अभियान संपन्न; गिरीश महाजन यांची उपस्थिती
नाशिक, 05 जून, (हिं.स.)। कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या सुंदर नाशिक अभियानांतर्गत जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून नाशिक शहरात नंदिनी नदी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानामध्ये जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या
नंदिनी नदी स्वच्छता अभियान संपन्न, कुंभ मंत्री गिरीश महाजन यांची उपस्थिती


नाशिक, 05 जून, (हिं.स.)। कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या सुंदर नाशिक अभियानांतर्गत जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून नाशिक शहरात नंदिनी नदी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानामध्ये जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या अनुयायांनी हजारोंच्या संख्येने सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रतिमेचे पूजन कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.

मुंबई नाका ते नासर्डी पूल परिसरादरम्यान वाहणाऱ्या नंदिनी नदीची स्वच्छता करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. या अभियानात जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचे सेवेकरी, शिष्य, साधक, युवा कार्यकर्ते तसेच पर्यावरणप्रेमी नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

या प्रसंगी नाशिकच्या महापौर हेमगौरी आडके, उपमहापौर विलास शिंदे, पश्चिम महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्र पीठप्रमुख संजय गाडेकर, अखिल भारतीय हिंदू संग्राम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शेखर मानकर तसेच मुंबई उपपीठ व उत्तर महाराष्ट्र उपपीठाचे व्यवस्थापक प्रवीण ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती.

या सेवाकार्यामध्ये उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, मुंबई तसेच कोकण विभागातून हजारोंच्या संख्येने सेवेकरी, संग्राम सैनिक, शिष्य, साधक व भक्तगण सहभागी झाले होते. महिला सेना, युवा सेना तसेच विविध सेवा विभागांतील कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने श्रमदान करून नंदिनी नदी स्वच्छतेच्या कार्यात योगदान दिले.

जगद्गुरु श्रीमद रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी यांचे सामाजिक कार्य व्यापक व अलौकिक आहे. जगदुरु श्रीमद रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी यांच्या प्रेरणेने हरित नाशिक, स्वच्छ नाशिक, उन्नत नाशिक यासाठी हजारो अनुयायांनी सहभाग घ्यावा. तसेच नाशिक शहराच्या मध्यवर्ती भागातून वाहणारी नंदिनी नदी स्वच्छ व प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे मंत्री नामदार गिरीश महाजन यांनी यावेळी सांगितले. यावेळी पर्यावरण संरक्षण, नदी संवर्धन व स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. स्वच्छ नदी स्वच्छ शहर-सुंदर पर्यावरण हा संदेश देत पर्यावरण संवर्धनाची जनजागृती करताना सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविणाऱ्या या उपक्रमाला सर्व स्तरांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande