नांदेड - बावलगाव जि. परिषद शाळेत नर्सरी, एलकेजी व यूकेजीचे वर्ग सुरू करण्यात येणार
नांदेड, 05 जून (हिं.स.)। ग्रामीण भागातील मुलांना दर्जेदार पूर्व प्राथमिक शिक्षण मिळावे, इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे वाढत्या आकर्षणाला पर्याय उपलब्ध व्हावा आणि मातृभाषेसोबत सर्वांगीण विकासाचे शिक्षण मिळावे, या उद्देशाने मराठवाडा-तेलंगणा सीमेलगतच्या
नांदेड - बावलगाव जि. परिषद शाळेत नर्सरी, एलकेजी व यूकेजीचे वर्ग सुरू करण्यात येणार


नांदेड, 05 जून (हिं.स.)। ग्रामीण भागातील मुलांना दर्जेदार पूर्व प्राथमिक शिक्षण मिळावे, इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे वाढत्या आकर्षणाला पर्याय उपलब्ध व्हावा आणि मातृभाषेसोबत सर्वांगीण विकासाचे शिक्षण मिळावे, या उद्देशाने मराठवाडा-तेलंगणा सीमेलगतच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बावलगाव येथे येत्या नवीन शैक्षणिक वर्षापासून नर्सरी, एलकेजी व यूकेजीचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. यासाठी लागणाऱ्या वर्गखोलीचे उद्घाटन करण्यात आले.

सध्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे आकर्षण वाढले असून, भरमसाठ फी घेऊन पालकांची दिशाभूल होत आहे.

बावलगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नर्सरी, एलकेजी, यूकेजीचे वर्ग सुरू करण्यासाठी शेडचे भूमिपूजन करण्यात आले.

अनेक जिल्हा परिषद व खासगी शाळा विद्यार्थी संख्येअभावी बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर बिलोली तालुक्यातील बावलगाव येथील सहशिक्षक बसवन्ना बरबडे यांनी ग्रामस्थांसमोर गावातच नर्सरी, एलकेजी व यूकेजी वर्ग सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावास ग्रामस्थांनी सकारात्मक प्रतिसाद देत पाठिंबा दर्शविला. या अभिनव उपक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य लक्ष्मण ठक्करवाड व गणेश पाटील मरखले यांच्या उपस्थितीत या वर्गासाठी लागणाऱ्या शेडचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी पालकांना मार्गदर्शनही करण्यात आले. जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या वाढवून दर्जेदार इंग्रजी शिक्षण उपलब्ध करून देण्याचा हा तालुक्यातील पहिलाच प्रयोग असल्याचा दावा यावेळी करण्यात आला. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील शिक्षणप्रेमींनी पुढाकार घेतला आहे.

लहान मुलांचे बालपण वाहनांमध्ये कोंबून हिरावले जात आहे. या पार्श्वभूमीवर बावलगाव जिल्हा परिषद शाळेतील नर्सरी, एलकेजी, यूकेजी उपक्रम हा निश्चितच दिशादर्शक ठरेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande