बीड - हिरकणी कक्ष, पाणी, पोलिस चौकी नसल्याने प्रवाशांची होतेय गैरसोय
बीड, 05 जून, (हिं.स.)। माजलगाव बसस्थानकाच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू असल्याने सध्या आगाराचे कामकाज तात्पुरत्या पत्र्याच्या शेडमधून केले जात आहे. मात्र, या तात्पुरत्या व्यवस्थेमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. प
बीड - हिरकणी कक्ष, पाणी, पोलिस चौकी नसल्याने प्रवाशांची होतेय गैरसोय


बीड, 05 जून, (हिं.स.)। माजलगाव बसस्थानकाच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू असल्याने सध्या आगाराचे कामकाज तात्पुरत्या पत्र्याच्या शेडमधून केले जात आहे. मात्र, या तात्पुरत्या व्यवस्थेमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. पोलिस चौकी, हिरकणी कक्ष, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच सुरक्षा यंत्रणेचा अभाव, यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.

दररोज शेकडो प्रवासी माजलगाव आगारातून जिल्ह्यातील तसेच राज्यातील विविध भागांत प्रवास करतात. पत्र्याच्या शेडमध्ये प्रवाशांना उकाडा, गर्दी आणि अपुऱ्या सुविधांचा सामना करावा लागत आहे. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या कुटुंबांची गैरसोय अधिक होत आहे. आगार परिसरात स्वतंत्र हिरकणी कक्ष नसल्याने स्तनदा माता व लहान बालकांसह प्रवास करणाऱ्या महिलांची कुचंबना होत आहे. बसस्थानकाच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे या ठिकाणी हिरकणी कक्ष सुरू नाही. लवकरच हा कक्ष सुरू करण्यात येईल.

बालकांना दूध पाजण्यासाठी किंवा विश्रांतीसाठी सुरक्षित जागा उपलब्ध नसल्याने महिलांची अडचण होत आहे. तसेच, आगार परिसरात

पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था नसल्याने प्रवाशांना खासगी विक्रेत्यांकडून पाणी खरेदी करावे लागत आहे.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande