सोलापूर विकासावर पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनात सुसंवाद बैठक
सोलापूर, 05 जून (हिं.स.)। ग्रामविकास व पंचायत राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सुसंवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत जिल्ह्याच्या विकासाशी संबंधित वि
fgdf


सोलापूर, 05 जून (हिं.स.)। ग्रामविकास व पंचायत राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सुसंवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत जिल्ह्याच्या विकासाशी संबंधित विविध विषयांवर सकारात्मक व फलदायी चर्चा करण्यात आली.

यावेळी पायाभूत सुविधा, ग्रामीण विकास, नागरी सुविधा, कृषी क्षेत्र आणि जिल्ह्याच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या विविध मुद्द्यांवर सखोल विचारविनिमय करण्यात आला. सोलापूरला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. बैठकीस आमदार देवेंद्र कोठे, जिल्हा परिषद अध्यक्ष दिपक वैद्य, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन दिलीपराव माने, जिल्हा परिषद सदस्य अदिनाथ देशमुख, बालाजी नरोटे, नगरसेवक तथा सभागृह नेते नरेंद्र दादा काळे आणि नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य बिज्जुआण्णा प्रधाने यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यातील समन्वय अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वपूर्ण ठरल्याचे उपस्थितांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande