
छत्रपती संभाजीनगर, 05 जून (हिं.स.)।
'पोलिओ मुक्त भारत' अभियानांतर्गत जिल्ह्यात दिनांक २८ जून रोजी पोलिओ लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाभरात बूथ स्तरावर आणि घरोघरी जाऊन लस दिली जाणार आहे.
जिल्हाधिकारी म्हणाले की, शिक्षण, अंगणवाडी, आरोग्य विभाग तसेच विविध सामाजिक संस्था आणि एनएसएस (NSS) च्या सहकार्याने ही मोहीम राबवावी.रेल्वे स्थानके, बस स्थानके, ग्रामीण भाग तसेच स्थलांतरित कामगारांच्या वस्त्यांवर विशेष लक्ष केंद्रित करून लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करावे. शिक्षण विभागाने शाळा व्यवस्थापनाला पालक सभांच्या माध्यमातून जनजागृती करण्याचे निर्देश द्यावेत आणि यात आरोग्य विभागाने पुढाकार घ्यावा. पावसाळ्याच्या दिवसांत उद्भवणाऱ्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी ग्रामीण भागात ओआरएस (ORS) पावडर, झिंक आणि इतर आवश्यक औषधांचा पुरेसा पुरवठा सुनिश्चित करावा.
पालकांनी आपल्या मुलींचे एचपीव्ही लसीकरण करण्यासाठी स्वतःहून पुढे यावे. तसेच पोलिओ, बीसीजी आणि गोवर-रुबेला लस देण्यासाठी सक्रिय पुढाकार घेत आपल्या जवळच्या अंगणवाडी केंद्रात किंवा शासकीय आरोग्य केंद्रामध्ये जाऊन बालकांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी केले.
---------------
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis