राष्ट्र सेवा दलाचा पुनर्गठन दिन मेळावा उत्साहात; सामाजिक समतेचा निर्धार
पुणे, 05 जून (हिं.स.)। राष्ट्र सेवा दलाच्या वतीने आयोजित पुनर्गठन दिन मेळावा, ‘विषमता निर्मूलन निर्धार आणि सन्मान सोहळा’ गुरुवारी सिंहगड रस्त्यावरील साने गुरुजी स्मारक येथे उत्साहात पार पडला. सामाजिक समता, बंधुता आणि लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी
राष्ट्र सेवा दलाचा पुनर्गठन दिन मेळावा उत्साहात; सामाजिक समतेचा निर्धार


पुणे, 05 जून (हिं.स.)।

राष्ट्र सेवा दलाच्या वतीने आयोजित पुनर्गठन दिन मेळावा, ‘विषमता निर्मूलन निर्धार आणि सन्मान सोहळा’ गुरुवारी सिंहगड रस्त्यावरील साने गुरुजी स्मारक येथे उत्साहात पार पडला. सामाजिक समता, बंधुता आणि लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता असल्याचा संदेश देत देश वाचविण्यासाठी निर्णायक लढ्याची गरज असल्याचा सूर मेळाव्यात उमटला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित शिंदे होते. प्रमुख पाहुणे म्हणून समाजवादी नेते कपिल पाटील, साधना ट्रस्टचे विश्वस्त सचिव हेमंत नाईकनवरे, राष्ट्र सेवा दलाचे कार्यकारी विश्वस्त जयवंत पाटील, राज्याध्यक्ष राजा कांदळकर तसेच नवनाथ गेंडे उपस्थित होते. याशिवाय विश्वस्त अतुल देशमुख, जाकीर अत्तार, ज्येष्ठ विश्वस्त अरविंद सावला, राष्ट्रीय महासचिव सुनील यादव, नितीन वैद्य, डॉ. हमीद दाभोलकर आणि काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांचीही उपस्थिती होती.

यावेळी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे कार्याध्यक्ष डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर यांना ‘साने गुरुजी समता पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. तसेच अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीच्या मार्गदर्शक डॉ. शैला नरेंद्र दाभोलकर, समाजवादी नेत्या साजेदा निहाल अहमद, ज्येष्ठ समाजवादी नेते व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, शिक्षण व सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते शिरीष चौधरी आणि शेतकरी, कामगार व प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांसाठी कार्यरत अॅड. सुरेश ठाकूर यांना ‘साने गुरुजी जीवन गौरव सन्मान’ देऊन गौरविण्यात आले.सन्मानार्थींनी आपल्या कार्याचा आढावा घेत सामाजिक बांधिलकी जपण्याचे आवाहन केले.

यावेळी बोलताना माजी आमदार कपिल पाटील यांनी लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक समतेच्या मूल्यांचे जतन करण्यासाठी राष्ट्र सेवा दलाचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. “आपला विचार बुलंद करण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे,” असे ते म्हणाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande