नांदेड - सतरा ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत १२ जूनला
नांदेड, 05 जून, (हिं.स.)। राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मुदत संपलेल्या तसेच नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सदस्यपदाच्या आरक्षण निश्चिती प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. याअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील बिगर व अं
नांदेड - सतरा ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत १२ जूनला


नांदेड, 05 जून, (हिं.स.)। राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मुदत संपलेल्या तसेच नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सदस्यपदाच्या आरक्षण निश्चिती प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. याअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील बिगर व अंशतः अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल कर्डिले यांनी संबंधित उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. त्यानुसार ८ जूनपर्यंत विशेष ग्रामसभांच्या सूचना प्रसिद्ध केल्या जाणार असून, १२ जून रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. त्यानंतर १९ जून रोजी प्रारूप आरक्षण प्रसिद्ध करण्यात येईल. प्रारूप आरक्षणावर हरकती व सूचना मागवून त्यांचा विचार करण्यात येणार असून, सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १० जुलैला अंतिम आरक्षण अधिसूचना प्रसिद्ध केली जाणार आहे. निवडणूक प्रक्रिया निर्भय वातावरणात पार पाडण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. आरक्षण निश्चिती करताना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग तसेच महिलांसाठीच्या आरक्षणाबाबत शासनाच्या विद्यमान नियमांचे काटेकोर पालन करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. दरम्यान, किनवट तालुक्यातील बिगर अनुसूचित क्षेत्रातील १७ ग्रामपंचायतींच्या सदस्यपदाच्या आरक्षण सोडतीचाही कार्यक्रम जाहीर केला. तालुक्यात एकूण १३४ ग्रामपंचायती असून, त्यापैकी संबंधित १७ग्रामपंचायतींसाठी ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. आरक्षण सोडत पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने पार पडणार असून, विविध प्रवर्गासाठी शासनाने निश्चित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande