इचलकरंजीतील बेजबाबदार प्रादेशिक परिवहन कार्यालयावर शिवसेनेची निदर्शने
कोल्हापूर, 05 जून, (हिं.स.)। जास्त मालवाहतुकीला प्राधान्य देणे, भरमसाठ तिकिटांचे दर, शहरातील अवैध किंवा क्षमतेपेक्षा जास्त वजनाची वाहतूक करणाऱ्या मालवाहतूक गाड्या तसेच धोकादायक वाहतूक करणाऱ्या मालवाहतूक गाड्या यासारख्या अनेक तक्रारींची दखल घेऊन प्र
उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयासमोर शिवसेनेची निदर्शने


कोल्हापूर, 05 जून, (हिं.स.)। जास्त मालवाहतुकीला प्राधान्य देणे, भरमसाठ तिकिटांचे दर, शहरातील अवैध किंवा क्षमतेपेक्षा जास्त वजनाची वाहतूक करणाऱ्या मालवाहतूक गाड्या तसेच धोकादायक वाहतूक करणाऱ्या मालवाहतूक गाड्या यासारख्या अनेक तक्रारींची दखल घेऊन प्रवाशांची होणारी गैरसोय, मनमानी कारभार व नियमांचे होणारे उल्लंघन याबाबत उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या कार्यालयासमोर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले निदर्शने करुन अधिकाऱ्यांना जाब विचारत धारेवर धरले. यावेळी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना अधिकाऱ्यांची भांबेरी उडाली. यावेळी शिष्टमंडळाच्या वतीने अधिकाऱ्यांना निवेदन दिले.

इचलकरंजी शहरातून महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी आरामदायी बस (ट्रॅव्हल्स) कंपन्यांविषयी तसेच धोकादायक मालवाहतूक करणाऱ्या गाड्या यासंदर्भात अनेक तक्रारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे प्राप्त झाल्या होत्या.

सबंधित नियमबाह्य तसेच धोकादायक वाहतूक करणाऱ्या बस तसेच मालवाहतूक गाड्यांवर त्वरित कारवाई करावी, ट्रॅव्हल्स कंपनीकडून होणारी प्रवाशांची वाताहत थांबवावी अन्यथा कोणतीही पूर्वकल्पना न देता शिवसेना स्टाईलने त्यांचा बंदोस्बत केला जाईल असा असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांनी दिला.

यावेळी शिवसैनिकांनी बेजबाबदार परिवहन अधिकारी यांच्या विरोधातील घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी माजी उपजिल्हाप्रमुख मलकारी लवटे, तालुकाप्रमुख आनंदा शेट्टी, शहरप्रमुख तथा नगरसेवक शिवाजी पाटील, महिला उपजिल्हाप्रमुख मंगल मुसळे, तालुकाप्रमुख शोभा गोरे, माजी नगरसेवक मनोज भाट, युवासेनेचे अभिजित लोले, सागर जाधव,रतन वाझे यांच्यासह शिवसैनिक, युवासैनिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande