
नांदेड, 05 जून (हिं.स.)।
देगलूर आगारातील हेड मेकॅनिक शिवाजी जाधव यांची कन्या श्वेता शिवाजी जाधव हिने राष्ट्रीय स्तरावरील बेसबॉल स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. ओडिशा येथे नुकत्याच झालेल्या ३१ व्या सब-ज्युनियर राष्ट्रीय बेसबॉल अजिंक्यपद स्पर्धेत श्वेताने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून आपल्या संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
लहान वयातच क्रीडा क्षेत्रात
सातत्यपूर्ण मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर श्वेताने हे यश संपादन केले आहे. राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक मिळवून तिने केवळ आपल्या कुटुंबाचेच नव्हे, तर देगलूर शहर आणि तालुक्याचे नावही उज्ज्वल केले आहे. श्वेताच्या या यशाबद्दल क्रीडा क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी तिची कामगिरी प्रेरणादायी ठरत असून, भविष्यातही ती राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis