परभणीत ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
परभणी, 05 जून (हिं.स.)। मोदी सरकारची यशस्वी १२ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने राबविण्यात येत असलेल्या विशेष अभियानांतर्गत तसेच जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पक्षाच्या वतीने परभणी शहरातील प्रभाग क्रमांक १ मधील स्वातंत्र्यवीर सा
मोदी सरकारच्या १२ वर्षांनिमित्त स्वच्छता अभियान व वृक्षारोपण ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद


परभणी, 05 जून (हिं.स.)।

मोदी सरकारची यशस्वी १२ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने राबविण्यात येत असलेल्या विशेष अभियानांतर्गत तसेच जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पक्षाच्या वतीने परभणी शहरातील प्रभाग क्रमांक १ मधील स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळा परिसरात स्वच्छता अभियान व वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमांतर्गत आयोजित कार्यक्रमात माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा खासदार भागवत कऱ्हाड यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी भाजपा परभणी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे, गटनेत्या तिरुमला खिल्लारे, गटनेते मुकिंद खिल्लारे, नगरसेवक दत्तात्रेय दैठणकर, गणेश टाक, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा मनीषा जाधव यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळा परिसराची स्वच्छता करण्यात आली तसेच विविध वृक्षांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. ‘एक पेड माँ के नाम’ या अभियानाच्या माध्यमातून प्रत्येकाने आपल्या आईच्या स्मरणार्थ किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे, असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी केले. यावेळी स्वच्छता, पर्यावरण संरक्षण आणि हरित भारत या संकल्पनांचा प्रचार करत वृक्षसंवर्धन ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande