विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून ' स्मार्ट' मेहनत करावी - मांडुरके
बीड, 05 जून, (हिं.स.)। विद्यार्थ्यांनी आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आधी स्वतःला ''का, काय आणि कसं करायचं?'' हे तीन प्रश्न विचारून आपले स्पष्ट ध्येय निश्चित केले पाहिजे. आज विद्यार्थ्यांमधील अभ्यासाची जागरूकता कुठेतरी हरवत चालली आहे, ती पुन्हा निर्म
विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून ' स्मार्ट' मेहनत करावी - मांडुरके


बीड, 05 जून, (हिं.स.)। विद्यार्थ्यांनी आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आधी स्वतःला 'का, काय आणि कसं करायचं?' हे तीन प्रश्न विचारून आपले स्पष्ट ध्येय निश्चित केले पाहिजे. आज विद्यार्थ्यांमधील अभ्यासाची जागरूकता कुठेतरी हरवत चालली आहे, ती पुन्हा निर्माण करणे गरजेचे आहे. आता कठोर परिश्रम करून चालणार नाही, तर काळाची पावले ओळखून 'स्मार्ट' मेहनत करावी लागेल, असे परखड मत गेवराई नगर परिषदेचे मुख्याधिकारी विक्रम मांडुरके यांनी व्यक्त केले.

नालंदा फाउंडेशन, बीडच्या वतीने गेवराई येथील छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक सभागृहात दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ तसेच करिअर मार्गदर्शन सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुरुकुल संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार बांदल होते. अध्यक्षीय मनोगतात डॉ. विजयकुमार बांदल यांनी संस्थेचे उपक्रम, विविध अभ्यासक्रम आणि उपलब्ध करिअर संधी याविषयी सविस्तर माहिती देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यानंतर दहावी व बारावी परीक्षेत यश मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा आणि करिअरच्या विविध संधींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. किशोर वाघमारे यांनी केले, तर आभार प्रा.डी.डी. राऊत यांनी मानले. कार्यक्रमास विद्यार्थी, पालक आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande