वृक्षारोपण संगोपन व संवर्धन काळाची गरज : डॉ. प्राणेश येवतीकर
परभणी, 05 जून (हिं.स.)। पर्यावरणीय समस्यांवर केवळ तात्पुरते व वरवरचे उपाय शोधण्याऐवजी वृक्षारोपण करून त्यांचे संगोपन व संवर्धन करणे ही काळाची गरज आहे, असे मत येथील पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्राणेश येवतीकर यांनी व्
वृक्षारोपण संगोपन व संवर्धन काळाची गरज : डॉ. प्राणेश येवतीकर


परभणी, 05 जून (हिं.स.)।

पर्यावरणीय समस्यांवर केवळ तात्पुरते व वरवरचे उपाय शोधण्याऐवजी वृक्षारोपण करून त्यांचे संगोपन व संवर्धन करणे ही काळाची गरज आहे, असे मत येथील पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्राणेश येवतीकर यांनी व्यक्त केले. जागतिक पर्यावरण दिन 2026 निमित्त पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयात वृक्षारोपण करण्यात आले. महाविद्यालयाच्या ग्रंथालय परिसरात आयोजित या उपक्रमाद्वारे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. यावेळी सहयोगी अधिष्ठाता डॉ. येवतीकर यांनी वृक्षारोपण करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनाची संकल्पना निसर्गाकडून प्रेरित, हवामानासाठी, आपल्या भविष्यासाठी ही असून ती हवामान कृती आणि निसर्गाधारित उपाययोजनांवर केंद्रित आहे. पर्यावरणीय समस्यांवर केवळ तात्पुरते व वरवरचे उपाय शोधण्याऐवजी वृक्षारोपण करून त्यांचे संगोपन व संवर्धन करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. या प्रसंगी महाविद्यालय परिसरात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. पर्यावरण संरक्षण, जैवविविधतेचे जतन आणि हरित परिसर निर्मितीचा संदेश देत मोठ्या उत्साहात जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. सदर वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन ग्रंथपाल, डॉ. कल्याण टेकाळे यांनी केले. कार्यक्रमात महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. पी. एम. केकाण, डॉ. गोविंद गंगणे, अधिकारी आणि कर्मचारी डॉ. पानगावकर, दि. अ. सुभेदार, र. रा. कनोजे आदी व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धनाची सामूहिक जबाबदारी अधोरेखित केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande