
गोकुळ गीते - प्रसाद हिरे निवडणूक लढविण्यावरती ठाम
नाशिक, 05 जून (हिं.स.)।
- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीसाठी बंडखोरांना शांत करण्याचा प्रयत्न हा पुन्हा एकदा अपयशी झाला आहे त्यामुळे बंडखोरांची बंडखोरी ही कायम आहे येणाऱ्या काळात बंडखोर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले असून अजून पर्यंत महायुतीचा घटक असलेल्या शिवसेना शिंदे गटाची डोकेदुखी मात्र कायम आहे.
नाशिक विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे गुरुवारी या मतदारसंघातून महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाला जागा देण्यात आली शिंदे गटाच्या वतीने माजी आमदार नरेंद्र दराडे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. तर त्यांच्या विरोधात कोणी उभे राहणार नाही या दृष्टिकोनातून काळजी घेतली गेली होती महाविकास आघाडीने निवडणूक ज्यावेळी सुरू झाली म्हणजे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली त्यावेळेसच आपली भूमिका स्पष्ट करताना ही निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतलेला होता. हे सर्व घडत असताना मात्र महाविकास आघाडीच्या वतीने ही जागा शिवसेना ठाकरे गटाला देण्यात आलेली होती आणि ठाकरे गटाचे संपर्क नेते रवींद्र मिर्लेकर यांनी स्पष्ट भूमिका घेताना सांगितले होते की आमच्याकडे योग्य उमेदवार नाही म्हणून आम्ही माघार घेत आहोत.
हे सर्व घडत असताना दुसरीकडे मात्र भाजपाचे माजी नगरसेवक गणेश गीते यांचे भाऊ गोकुळ गीते यांनी मात्र आपली उमेदवारी कायम ठेवली त्यामुळे या निवडणुकीमध्ये गीते विरुद्ध दराडे यांच्यातील संघर्ष होत आहे गोकुळ गीते हे कोणत्याही राजकीय पक्षाशी निगडित नाही मात्र भाजपाचे नेते कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांचे ते समर्थक आहे . त्यामुळे गोकुळ गीते हे गिरीश महाजन यांच्या ऐकून माघार घेतील आणि ही निवडणूक बिनविरोध होईल असा अंदाज बांधला जात होता परंतु काल गुरुवारी शेवटच्या दिवशी तो अपयशी ठरला त्यानंतर गुरुवारी रात्री उशिरा गिरीश महाजन हे नाशिक मध्ये आले आणि राज्याचे उद्योग मंत्री शिंदे गटाच्या शिवसेनेचे नेते उदय सामंत हे देखील नाशिकमध्ये आले या दोघांनी देखील रात्रभर बंडखोरांशी चर्चा केली त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आज सकाळी गोकुळ गीते यांनी गिरीश महाजन यांच्याशी चर्चा केली मात्र त्यानंतर ते नॉट रिचेबल झाले तर भाजपाचे पदाधिकारी असलेले प्रसाद हिरे हेदेखील सकाळी फोनवर उपलब्ध होते मात्र त्यानंतर ते देखील नॉट रिचेबल झाले त्यामुळे या बंडखोरांशी संपर्क झालेला नाही दिवसभर प्रयत्न करूनही गिरीश महाजन आणि उदय सामंत यांना बंडखोरांचे ताबूत शांत करता आलेले नाही या दोन्हीही बंडखोरांचा पाठिंबा नरेंद्र दराडे यांना घेऊन ही निवडणूक बिनविरोध करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्या हालचाली सुरू होत्या परंतु त्याला यश आलेले नाही आता येणाऱ्या काळात हे बंडखोर आपले ताबूत म्यान करणार की निवडणुकीच्या मैदानात सामोरे जाणार हे काळच ठरविणार आहे त्याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे मात्र शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नरेंद्र दराडे यांची डोकेदुखी मात्र कमी झालेली नाही
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV