प्रत्येकाने वृक्ष लागवड व संगोपन करावे – आ. विजय देशमुख
सोलापूर, 05 जून, (हिं.स.)। जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राष्ट्रतेज अटल कामगार गृहनिर्माण सहकारी संस्था मर्यादित, दहिटणे यांच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम आमदार विजय देशमुख यांच्या शुभहस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पा
sdfg


सोलापूर, 05 जून, (हिं.स.)। जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राष्ट्रतेज अटल कामगार गृहनिर्माण सहकारी संस्था मर्यादित, दहिटणे यांच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम आमदार विजय देशमुख यांच्या शुभहस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

यावेळी आमदार विजय देशमुख यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत नागरिकांना अधिकाधिक वृक्ष लागवड व त्यांचे संगोपन करण्याचे आवाहन केले. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज असून प्रत्येक नागरिकाने या सामाजिक चळवळीत सक्रिय सहभाग घ्यावा, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमास संस्थेचे ट्रस्टी अध्यक्ष सुरेश बिराजदार, नगरसेवक अविनाश पाटील, ज्ञानेश्वर कारभारी, बसवराज इटकळे, संजय कणके, राजेश दिड्डी, सतीश भरमशेट्टी, सिद्धाराम महिंद्रकर, अमोल काटकर यांच्यासह संस्थेचे सभासद, महिला व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वृक्षारोपण उपक्रमाद्वारे पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला असून उपस्थितांनी वृक्षसंवर्धनाची सामूहिक जबाबदारी पार पाडण्याचा निर्धार व्यक्त केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande