पुण्यात नवसागर मिश्रित गावठी दारू विक्रीचा पर्दाफाश; आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे, 05 जून (हिं.स.)। हडपसर आणि फुगेवाडी येथे विषारी दारूमुळे अनेकांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी वारजे माळवाडी आणि केशवनगर (मुंढवा) परिसरातील अवैध हातभट्टी दारू अड्ड्यांवर धडक कारवाई केली. या कारवाईत मोठ्या प्रमाणात गावठी दारू तसे
पुण्यात नवसागर मिश्रित गावठी दारू विक्रीचा पर्दाफाश; आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल


पुणे, 05 जून (हिं.स.)।

हडपसर आणि फुगेवाडी येथे विषारी दारूमुळे अनेकांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी वारजे माळवाडी आणि केशवनगर (मुंढवा) परिसरातील अवैध हातभट्टी दारू अड्ड्यांवर धडक कारवाई केली. या कारवाईत मोठ्या प्रमाणात गावठी दारू तसेच नवसागरासह विषारी रसायनांचा साठा जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे हे दोन्ही अड्डे महिलांकडून चालविले जात असल्याचे तपासात समोर आले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे माळवाडीतील काळेश्वरी मंदिरामागील मोकळ्या जागेत नवसागर आणि इतर विषारी रसायने मिसळून गावठी हातभट्टी दारूची विक्री सुरू होती. या माहितीच्या आधारे वारजे माळवाडी पोलिसांनीछापा टाकून कारवाई केली.या प्रकरणी मुख्य आरोपी प्रीती विजय नवले (वय 38, रा. वारजे माळवाडी) हिला अटक करण्यात आली आहे. तसेच सागर बिरे, शशी कचरावत, सुधीर कचरावत, संगीता परदेशी, जुबेर शेख, वैशाली उर्फ याडी चव्हाण आणि लताबाई रास्ते यांच्याविरुद्ध वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपासादरम्यान आरोपी महिलेने दोन ते तीन दिवसांपूर्वीच सुमारे 300 लिटर विषारी रसायनमिश्रित दारू विकत आणल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिस अंमलदार अमित शेलार यांनी फिर्याद दाखल केली असून पुढील तपास सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande