
छत्रपती संभाजीनगर, 06 जून (हिं.स.) : शासन सेवेत कार्यरत तसेच सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित सेवाविषयक अडचणींचे तातडीने निराकरण करण्यासाठी संबंधित विभागांनी पूर्ण क्षमतेने कार्य करावे, असे निर्देश विभागीय आयुक्त श्री. जी. श्रीकांत (भा.प्र.से.) यांनी दिले.
त्यांच्या संकल्पनेतून आयोजित पहिले विभागीय कर्मचारी समाधान शिबिर विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडले. या शिबिरात पाच सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचा निपटारा करण्यात आला.यावेळी विभागीय आयुक्तांनी स्पष्ट केले की, रजा नोंदी, पेन्शन, ग्रॅच्युइटी, वेतनवाढीची थकबाकी तसेच इतर देय रक्कम वेळेत मिळणे हा प्रत्येक अधिकारी-कर्मचाऱ्याचा हक्क आहे. कार्यालयीन विलंबामुळे त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणे ही गंभीर बाब असून अशा प्रकरणांना प्राधान्याने हाताळणे आवश्यक आहे, असेही त्यांनी नमूद केले.या उपक्रमामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या समस्यांचे जलद निराकरण होण्यास मदत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis