नैसर्गिक व तंत्रज्ञानाधारित शेतीत महाराष्ट्र देशाचे नेतृत्व करेल - राज्यपाल
मुंबई, 01 जुलै (हिं.स.)। : दिवंगत वसंतराव नाईक यांनी शेतकरी आणि कृषी क्षेत्राच्या विकासासाठी दूरदृष्टीने अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले. सत्तरच्या दशकात महाराष्ट्र भीषण दुष्काळाचा सामना करत असताना त्यांनी कृषी क्षेत्राला नवी दिशा दिली. राज्यात कृषी वि
Agricultural sector


मुंबई, 01 जुलै (हिं.स.)। : दिवंगत वसंतराव नाईक यांनी शेतकरी आणि कृषी क्षेत्राच्या विकासासाठी दूरदृष्टीने अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले. सत्तरच्या दशकात महाराष्ट्र भीषण दुष्काळाचा सामना करत असताना त्यांनी कृषी क्षेत्राला नवी दिशा दिली. राज्यात कृषी विद्यापीठांच्या स्थापनेत त्यांचे मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.

वरळी येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम येथे कृषी विभागातर्फे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त १ जुलै या कृषि दिनानिमित्त आयोजित कृषि पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते.

कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, कृषि मंत्री दत्तात्रय भरणे,जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, रोजगार हमी, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, राज्यमंत्री अॅड.आशिष जयस्वाल, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, कृषी विभागाचे सचिव परिमल सिंह, आयुक्त सुरज मांढरे यासह राज्यातील कृषि पुरस्कार विजेते उपस्थित होते.

डॉ.पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार २०२३ कोल्‍हापुर विभाग मधून मु.पो.तळसंदे, ता.हातकणंगले, येथील डॉ.संजय ज्ञानदेव पाटील यांना तर २०२४ चा ठाणे विभागातून जि.पालघर, ता. तलासरी, मु.पो.ब्राम्हणगाव (झाई बोरीगाव) येथील यज्ञेश वसंत सावे यांना तीन लाखांचे पारितोषिक व सन्मानपत्र वितरण करण्यात आले. कृषि विभागात प्रातिनिधीक स्वरूपात लॅपटॉपचे वितरण करण्यात आले.

राज्यपाल वर्मा म्हणाले की, भारताची संस्कृती, परंपरा आणि समृद्धीचा पाया शेतकरी आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अनेकदा शेतकऱ्यांचे कल्याण ही केंद्र सरकारची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे स्पष्ट केले आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, पीक विमा योजना आणि किसान क्रेडिट कार्ड यांसारख्या योजनांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षा मिळत असून पशुपालक आणि मत्स्यव्यवसायिकांनाही कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध होत आहे.'बीज ते बाजार' ही संकल्पना शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य बाजारपेठ आणि योग्य भाव मिळवून देण्यासाठी प्रभावी ठरत आहे.

पुढील पिढीला दुष्काळाची झळ बसू देणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यातील शेती अधिक सक्षम, शाश्वत आणि फायदेशीर करण्यासाठी जलसंधारण, सौर कृषी पंप, दिवसा मोफत वीज, कृषी यांत्रिकीकरण, प्रमाणित बियाणे, सिंचन सुविधा आणि शेतकऱ्यांना आर्थिक आधार अशा विविध योजनांद्वारे राज्य शासन सातत्याने काम करत असून, महाराष्ट्राच्या पुढील पिढीला दुष्काळाची झळ बसू देणार नाही. राज्यात जलयुक्त शिवार अभियान आणि शेततळे योजनेच्या माध्यमातून २२ हजारांहून अधिक गावांमध्ये जलसंधारणाची व्यापक कामे करण्यात आली आहेत. या कामांमुळे अनेक भागांमध्ये एक पिकावरून दोन आणि तीन पिकांची शेती शक्य झाली असून, ज्या भागात शेती करणे कठीण होते, त्या ठिकाणीही फळबागा फुलू लागल्या आहेत. हवामान बदलाच्या आव्हानांवर मात करण्यासाठी जलसंधारण हा प्रभावी उपाय ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.

२०२३ व २०२४ साठी १८९ पुरस्कारार्थीं

डॉ.पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्करासाठी राज्यातून एक पुरस्कारार्थी असून रूपये तीन लाखांचे पारितोषिक व सन्मानपत्र वितरण करण्यात आले. २०२३ व २०२४ मध्ये दोन विजेते आहेत. वसंतराव नाईक कृषिभूषण ८ (प्रति विभाग १ याप्रमाणे) दोन लाख रूपये असे प्रमाणे २०२३ मध्ये ६ व २०२४ साठी ८ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. जिजामाता कृषिभूषण पुरस्कार ८ (प्रति विभाग १ याप्रमाणे) दोन लाख रूपये असे प्रमाणे २०२३ मध्ये ८ व २०२४ मध्ये ८ पुरस्कार, कृषिभूषण (सेंद्रिय शेती) मध्ये ८ (प्रति विभाग १ याप्रमाणे) दोन लाख रूपये असे प्रमाणे २०२३ मध्ये ७, २०२४ मध्ये ८ पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार मध्ये ८ (प्रति विभाग १ याप्रमाणे) १ लाख २० हजार रूपये असे प्रमाणे २०२३ मध्ये ७, २०२४ मध्ये ८ पुरस्कार, युवा शेतकरी मध्ये ८ (प्रति विभाग १ याप्रमाणे) १ लाख २० हजार रूपये पारितोषिक रक्कम सन २०२३ मध्ये ८, २०२४ मध्ये ८ पुरस्कार, उद्यान पंडित ८ (प्रति विभाग १ याप्रमाणे) १ लाख रूपये पारितोषिक रक्कम २०२३ मध्ये ८, २०२४ मध्ये ८ पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कारामध्ये ४० (सर्वसाधारण प्रवर्ग साठी प्रति जिल्हा १ याप्रमाणे ३४ व आदिवासी प्रवर्ग साठी प्रति विभाग १ याप्रमाणे ०६ ) ४४ हजार रूपये पारितोषिक रक्कम, २०२३ मध्ये ३६, २०२४ मध्ये ३९ पुरस्कार, सेवारत्न पुरस्कारासाठी १० (प्रति विभाग १ याप्रमाणे ८, कृषी आयुक्तालय स्तर-१ व मंत्रालय स्तर -१) २०२३ मध्ये १० २०२४ मध्ये १० पुरस्कारांचे वितरणा करण्यात आले असे एकूण २०२३ साठी ९१ व २०२४ साठी ९८ एकूण १८९ पुरस्कारार्थींना पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

सन २०२३ व सन २०२४ साठी १८९ पुरस्कारार्थीं कृषी पुरस्काराने सन्मानित

राज्यात कृषिक्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणा-या शेतक-यांना व अधिका-यांना कृषि विभागामार्फत डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, कृषिभूषण (सेंद्रिय शेती), उद्यान पंडीत, वसंतराव नाईक शेतीमित्र, युवा शेतकरी, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, पीकस्पर्धा विजेते, पद्मश्री. डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवारत्न पुरस्कार प्रदान करुन सन्मानित करण्यात आले.वरळी डोम सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात यावेळी राज्यपाल व जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, कृषि मंत्री दत्तात्रय भरणे,जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, रोजगार हमी, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले,राज्यमंत्री अॅड.आशिष जयस्वाल, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, कृषी विभागाचे सचिव परिमल सिंह, आयुक्त सुरज मांढरे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार सन २०२३ कोल्‍हापुर विभाग मधून मु.पो.तळसंदे, ता.हातकणंगले, येथील डॉ.संजय ज्ञानदेव पाटील यांना तर सन २०२४ चा ठाणे विभागातून जि.पालघर, ता. तलासरी, मु.पो.ब्राम्हणगाव (झाई बोरीगाव) येथील श्री.यज्ञेश वसंत सावे यांना तीन लाखांचे पारितोषिक व सन्मानपत्र वितरण करण्यात आले.

डॉ.पंजाबराव देशमुख कृषिरत्न राज्यातून एक पुरस्कारार्थी असून रूपये तीन लाखांचे पारितोषिक व सन्मानपत्र वितरण करण्यात आले.असे सन २०२३ व २०२४ मध्ये दोन विजेते आहेत. वसंतराव नाईक कृषिभूषण ८ (प्रति विभाग १ याप्रमाणे) दोन लाख रूपये असे प्रमाणे सन २०२३ मध्ये ६ व २०२४ मध्ये ८ पुरस्कार वितरण करण्यात आले. जिजामाता कृषिभूषण पुरस्कार ८ (प्रति विभाग १ याप्रमाणे) दोन लाख रूपये असे प्रमाणे सन २०२३ मध्ये ८ व सन २०२४ मध्ये ८ पुरस्कार, कृषिभूषण (सेंद्रिय शेती) मध्ये ८ (प्रति विभाग १ याप्रमाणे) दोन लाख रूपये असे प्रमाणे सन २०२३ मध्ये ७ सन २०२४ मध्ये ८ पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार मध्ये ८ (प्रति विभाग १ याप्रमाणे) १ लाख २० हजार रूपये असे प्रमाणे सन २०२३ मध्ये ७ सन २०२४ मध्ये ८ पुरस्कार, युवा शेतकरी मध्ये ८ (प्रति विभाग १ याप्रमाणे) १ लाख २० हजार रूपये पारितोषिक रक्कम सन २०२३ मध्ये ८ सन २०२४ मध्ये ८ पुरस्कार, उद्यान पंडित८ (प्रति विभाग १ याप्रमाणे) १ लाख रूपये पारितोषिक रक्कम सन २०२३ मध्ये ८ सन २०२४ मध्ये ८ पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कारामध्ये ४० (सर्वसाधारण प्रवर्ग साठी प्रति जिल्हा १ याप्रमाणे ३४ व आदिवासी प्रवर्ग साठी प्रति विभाग १ याप्रमाणे ०६ ) चव्वचाळीस हजार रूपये पारितोषिक रक्कम सन २०२३ मध्ये ३६ सन २०२४ मध्ये ३९ पुरस्कार, सेवारत्न पुरस्कारासाठी १० (प्रति विभाग १ याप्रमाणे ०८, कृषी आयुक्तालय स्तर-०१ व मंत्रालय स्तर -०१) सन २०२३ मध्ये १० सन २०२४ मध्ये १० पुरस्कारांचे वितरणा करण्यात आले असे एकूण सन २०२३ साठी ९१ व सन २०२४ साठी ९८ एकूण १८९ पुरस्कारार्थींना पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande