रायगड - तंबाखूविरोधी मोहिमेला वेग; जिल्हास्तरीय समन्वय बैठकीत महत्त्वाचे निर्णय
रायगड, 10 जुलै (हिं.स.)। : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत रायगड जिल्ह्यात तंबाखूविरोधी मोहिमेला अधिक प्रभावी स्वरूप देण्यासाठी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय तंबाखू सनियंत्रण व समन्वय समितीची आढावा बैठक तसेच एकदिवसीय कार्यशाळा अलिबाग येथी
### **रायगडात तंबाखू नियंत्रणासाठी प्रशासनाचा कडक निर्धार; जिल्हास्तरीय कार्यशाळेत कायद्यांच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर**  **अलिबाग, दि. 10 :** राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत रायगड जिल्ह्यात तंबाखूविरोधी मोहिमेला अधिक प्रभावी स्वरूप देण्यासाठी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय तंबाखू सनियंत्रण व समन्वय समितीची आढावा बैठक तसेच एकदिवसीय कार्यशाळा अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात पार पडली. जिल्हा रुग्णालय रायगड आणि मराठवाडा ग्रामीण विकास संस्था, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यशाळेत **कोटपा (COTPA) 2003** आणि **जागतिक आरोग्य संघटनेच्या एफसीटीसी 5.3** अंतर्गत असलेल्या तरतुदींच्या प्रभावी अंमलबजावणीवर विशेष भर देण्यात आला.  जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय तंबाखू सनियंत्रण व समन्वय समितीचे अध्यक्ष **किशन जावळे** यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीस जिल्हा शल्यचिकित्सक व समितीचे सचिव **डॉ. निशिकांत पाटील**, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी **डॉ. जयेश गोसावी** यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.  या बैठकीला पोलीस विभाग, पनवेल महानगरपालिका, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अलिबाग, शिक्षण विभाग, तालुका आरोग्य अधिकारी, दंतशल्यचिकित्सक, अन्न व औषध प्रशासन, नगरपालिका, पंचायत समिती, एमजीएम दंत महाविद्यालय तसेच विविध स्वयंसेवी संस्था आणि महाविद्यालयांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.  बैठकीत **तंबाखूमुक्त शाळा**, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान प्रतिबंध, कोटपा 2003 अंतर्गत दंडात्मक कारवाई, शैक्षणिक संस्थांचा सहभाग, पर्यटनस्थळांवरील जनजागृती तसेच तंबाखू नियंत्रण कायद्याच्या काटेकोर अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.  कार्यशाळेत मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे संचालक **आप्पासाहेब उगले** यांनी कोटपा 2003 मधील **कलम 4, 5, 6(अ), 6(ब), 7 आणि 8** यांची माहिती दिली. तसेच **एफसीटीसी 5.3** संदर्भातील मार्गदर्शक तत्त्वांवर पॉवरपॉइंट सादरीकरणाद्वारे जिल्हा व तालुका स्तरावरील समन्वय समित्यांना मार्गदर्शन करण्यात आले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन **प्रतिम सुतार** यांनी केले. **डॉ. विकास पवार**, जिल्हा सल्लागार (एनटीसीपी), यांनी उपस्थितांना तंबाखूविरोधी शपथ दिली. **सुशील साईकर** यांनी आभार प्रदर्शन केले.  कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी **हितेश जाधव, अनिल गुंजे, गणेश उगले, योगेश उगले** तसेच जिल्हा रुग्णालयातील **रुपेश म्हात्रे** आणि **सौरभ पाटील** यांनी विशेष सहकार्य केले.

रायगड, 10 जुलै (हिं.स.)। : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत रायगड जिल्ह्यात तंबाखूविरोधी मोहिमेला अधिक प्रभावी स्वरूप देण्यासाठी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय तंबाखू सनियंत्रण व समन्वय समितीची आढावा बैठक तसेच एकदिवसीय कार्यशाळा अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात पार पडली. जिल्हा रुग्णालय रायगड आणि मराठवाडा ग्रामीण विकास संस्था, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यशाळेत कोटपा (COTPA) 2003 आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या एफसीटीसी 5.3 अंतर्गत असलेल्या तरतुदींच्या प्रभावी अंमलबजावणीवर विशेष भर देण्यात आला.

जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय तंबाखू सनियंत्रण व समन्वय समितीचे अध्यक्ष किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीस जिल्हा शल्यचिकित्सक व समितीचे सचिव डॉ. निशिकांत पाटील, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयेश गोसावी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीला पोलीस विभाग, पनवेल महानगरपालिका, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अलिबाग, शिक्षण विभाग, तालुका आरोग्य अधिकारी, दंतशल्यचिकित्सक, अन्न व औषध प्रशासन, नगरपालिका, पंचायत समिती, एमजीएम दंत महाविद्यालय तसेच विविध स्वयंसेवी संस्था आणि महाविद्यालयांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

बैठकीत तंबाखूमुक्त शाळा, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान प्रतिबंध, कोटपा 2003 अंतर्गत दंडात्मक कारवाई, शैक्षणिक संस्थांचा सहभाग, पर्यटनस्थळांवरील जनजागृती तसेच तंबाखू नियंत्रण कायद्याच्या काटेकोर अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

कार्यशाळेत मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे संचालक आप्पासाहेब उगले यांनी कोटपा 2003 मधील कलम 4, 5, 6(अ), 6(ब), 7 आणि 8 यांची माहिती दिली. तसेच एफसीटीसी 5.3 संदर्भातील मार्गदर्शक तत्त्वांवर पॉवरपॉइंट सादरीकरणाद्वारे जिल्हा व तालुका स्तरावरील समन्वय समित्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी हितेश जाधव, अनिल गुंजे, गणेश उगले, योगेश उगले तसेच जिल्हा रुग्णालयातील रुपेश म्हात्रे आणि सौरभ पाटील यांनी विशेष सहकार्य केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)

 rajesh pande