मधमाशी पालनातून शेतीला फायदा, उत्पन्नात भर; मधकेंद्र योजनेची माहिती जाहीर
रायगड, 10 जुलै, (हिं.स.) : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत राबविण्यात येणारी ''मधकेंद्र (मधमाशी पालन) योजना'' शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी उत्पन्नवाढीची सुवर्णसंधी ठरत असल्याची माहिती प्र. जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, रायगड-अलिबाग
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, रायगड. पत्ता: जिल्हा उद्योग केंद्र इमारत (District Industries Centre), ठिकरुळ नाका, रायगड बाजारजवळ, अलिबाग,  दूरध्वनी क्रमांक: 02141-222642 मोबाईल क्रमांक: दर्शन ठोके (मधुक्षेत्रिक) 8356051494, ईमेल आयडी: dvioraigad@mskvib.org.


Beekeeping-benefits-agricultur


रायगड, 10 जुलै, (हिं.स.) : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत राबविण्यात येणारी 'मधकेंद्र (मधमाशी पालन) योजना' शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी उत्पन्नवाढीची सुवर्णसंधी ठरत असल्याची माहिती प्र. जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, रायगड-अलिबाग यांनी दिली. १८ जून २०१९ च्या शासन निर्णयानुसार ही योजना संपूर्ण राज्यात कार्यान्वित असून, मधमाशी पालनाला प्रोत्साहन देण्याबरोबरच ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती करणे हा तिचा प्रमुख उद्देश आहे.

या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मधपेट्या, मधमाशी वसाहत, मधयंत्र तसेच आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिले जाते. प्रकल्प खर्चाच्या ५० टक्के रक्कम शासनाकडून अनुदान स्वरूपात दिली जाते, तर उर्वरित ५० टक्के लाभार्थ्याने स्वगुंतवणूक म्हणून भरायची असते.मधमाशी पालनामुळे मध आणि मेण विक्रीतून अतिरिक्त उत्पन्न मिळते. तसेच मधमाशांच्या परागीभवनामुळे शेती पिकांच्या उत्पादनात ३० ते ४० टक्क्यांपर्यंत वाढ होण्यास मदत होते. रॉयल जेली, प्रोपोलिस आणि मधमाशांचे विष यांसारख्या उत्पादनांमधूनही उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत उपलब्ध होतात.

योजनेत सहभागी होणाऱ्या लाभार्थ्यांसाठी १० दिवसांचे निवासी प्रशिक्षण, तसेच प्रगत मधपाळांसाठी महाबळेश्वर येथे २० दिवसांचे विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात येते. राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था मंडळामार्फत विनामूल्य केली जाते.

योजनेसाठी आधार कार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्र, ७/१२ व ८-अ उतारा (असल्यास), बँक पासबुक, छायाचित्र आणि विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक आहे. इच्छुक लाभार्थ्यांनी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, रायगड. पत्ता: जिल्हा उद्योग केंद्र इमारत (District Industries Centre), ठिकरुळ नाका, रायगड बाजारजवळ, अलिबाग, दूरध्वनी क्रमांक: 02141-222642 मोबाईल क्रमांक: दर्शन ठोके (मधुक्षेत्रिक) 8356051494, ईमेल आयडी: dvioraigad@mskvib.org. कार्यालयाशी संपर्क साधून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande