मतदारयादी पुनरिक्षणात दापोली राज्यात सहाव्या, चिपळूण नवव्या स्थानावर
रत्नागिरी, 10 जुलै (हिं.स.) । मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमात दापोली मतदारसंघ राज्यात सहावा, तर चिपळूण नवव्या स्थानावर आहे. पुनरिक्षणाच्या अनुषंगाने जिल्ह्यामधील Enumeration Form चे डिजिटायझेशन १०० टक्के पूर्ण केलेल्या मतदान केंद
मतदारयादी पुनरिक्षणात दापोली राज्यात सहाव्या, चिपळूण नवव्या स्थानावर


रत्नागिरी, 10 जुलै (हिं.स.) । मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमात दापोली मतदारसंघ राज्यात सहावा, तर चिपळूण नवव्या स्थानावर आहे.

पुनरिक्षणाच्या अनुषंगाने जिल्ह्यामधील Enumeration Form चे डिजिटायझेशन १०० टक्के पूर्ण केलेल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मनुज जिंदल यांनी प्रशस्तीपत्र देऊन आज गौरविले. या कामकाजात राज्यात पहिल्या ३० क्रमांकात जिल्ह्यातील ४ मतदारसंघांचा आजअखेर समावेश असून, दापोली मतदारसंघ सहाव्या क्रमांकावर, चिपळूण नवव्या क्रमांकावर, गुहागर १९व्या क्रमांकावर, तर राजापूर २७व्या क्रमांकावर आहे.

चिपळूण मतदारसंघातील यादी भाग क्रमांक ३११ -कोंडभुजबळच्या बीएलओ आरती अमित घस्ते, यादी भाग क्रमांक ११०-टेरव (बु) च्या बीएलओ सुप्रिया किसन लोखंडे व त्यांची सहाय्यक अंगणवाडी ताई मधुरा विश्वनाथ साळवी, रत्नागिरी मतदारसंघातील यादी भाग क्रमांक ४३-खालगावचे बीएलओ चेतन कुंडलिक मेहेर व त्यांच्या पर्यवेक्षक सीमा धुळप यांनी १०० टक्के डिदिटायझेशनचे केले आहे.

जिल्हाधिकारी श्री. जिंदल यांनी प्रशस्तीपत्रक देऊन आज या सर्वांचा सत्कार केला. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, नायब तहसीलदार दीपक चव्हाण उपस्थित होते.

चिपळूण तालुक्यातील टेरव बुद्रुक या गावाने डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत आपले काम १०० टक्के पूर्ण केले असून, हा बहुमान मिळवणारे ते महाराष्ट्रातील पहिले गाव ठरले आहे. त्याचबरोबर राज्यातील पहिल्या ३० क्रमांकात जिल्ह्यातील ४ मतदारसंघांचा समावेश झाला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande