अमरावती : महसुली तंटामुक्त समितीच्या मध्यस्थीने शेतरस्त्याचा वाद मिटला
अमरावती, 10 जुलै (हिं.स.) | पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महसुली तंटामुक्त गाव अभियानांतर्गत मौजा रबांग येथील शेतरस्त्यावरील वाद महसुली तंटामुक्त समितीच्या मध्यस्थीने सामंजस्याने सोडविण्यात आला. या निर्णयामुळे सुमारे २० ते २५ खातेदार शेतकऱ्यांच्या श
शेतरस्त्याचा वाद मिटला महसुली तंटामुक्त समितीच्या मध्यस्थीने मार्ग खुला


अमरावती, 10 जुलै (हिं.स.) | पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महसुली तंटामुक्त गाव अभियानांतर्गत मौजा रबांग येथील शेतरस्त्यावरील वाद महसुली तंटामुक्त समितीच्या मध्यस्थीने सामंजस्याने सोडविण्यात आला. या निर्णयामुळे सुमारे २० ते २५ खातेदार शेतकऱ्यांच्या शेतात जाण्याचा मार्ग पुन्हा खुला झाला आहे.

मौजा रबांग येथील मांगीलाल सोहनलाल भिलावेकर यांनी अनेक शेतकऱ्यांच्या शेतात जाणारा शेतरस्ता अडविल्याची तक्रार महसूल विभागाकडे प्राप्त झाली होती. त्यानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महसुली तंटामुक्त गाव समिती, महसूल विभागाचे अधिकारी आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी समितीने अर्जदार आणि गैरअर्जदार यांची समजूत काढून पंचांसमक्ष आपसी सहमतीने वाद मिटविला. त्यानंतर संबंधित शेतरस्ता तातडीने मोकळा करून देण्यात आला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची गैरसोय दूर झाली असून शेतात जाण्याचा मार्ग पुन्हा उपलब्ध झाला आहे. याप्रसंगी ग्राम महसुली तंटामुक्त समितीचे अध्यक्ष व सदस्य, मंडळ अधिकारी रोकडे, ग्राम महसूल अधिकारी दिनेश कास्देकर, उपसरपंच चुन्नीलाल जावरकर, पोलिस पाटील शंकरलाल दारसिंबे तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. ही कारवाई धारणीचे तहसीलदार प्रदीप शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

---------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande