
रत्नागिरी, 10 जुलै (हिं.स.) । वाइल्डलाइफ अनलिमिटेड, चिपळूण, रत्नागिरी वन विभाग आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने कै. नीलेश बापट निसर्ग कट्टा अंतर्गत 'मुशाफिर जंगलवाटांचे' या कार्यक्रम मालिकेतील पाचवे पुष्प 'वन्यजीवांचा राखण्या' या विषयावर आयोजित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात सुप्रसिद्ध निसर्गतज्ज्ञ विश्वास तथा भाऊ काटदरे यांची प्रकट मुलाखत होणार असून, वन्यजीव संवर्धन, जंगलातील अनुभव आणि पर्यावरण संरक्षणाविषयी ते उपस्थितांशी संवाद साधणार आहेत.
हा कार्यक्रम शुक्रवार, १७ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता मार्कंडी, चिपळूण येथील वन भवनातील निसर्गसेवक कै. नीलेश बापट कलादालनात होणार आहे.
कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून, निसर्गप्रेमी, विद्यार्थी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी