रुग्णालयांच्या शुल्कावर नियंत्रणासह कर्करोग उपचारांसाठी नवीन पॅकेजेस - आरोग्य मंत्री
मुंबई, 10 जुलै (हिं.स.) : राज्यातील नागरिकांना अधिक दर्जेदार, सुलभ आणि परवडणाऱ्या आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य क्षेत्रात विविध धोरणात्मक सुधारणा करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात
रुग्णालयांच्या शुल्कावर नियंत्रणासह कर्करोग उपचारांसाठी नवीन पॅकेजेस - आरोग्य मंत्री


मुंबई, 10 जुलै (हिं.स.) : राज्यातील नागरिकांना अधिक दर्जेदार, सुलभ आणि परवडणाऱ्या आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य क्षेत्रात विविध धोरणात्मक सुधारणा करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली .

विधानसभा सदस्य प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना मंत्री आबिटकर बोलत होते. सदस्य मनिषा चौधरी यांच्या सह अन्य सदस्यांनी या चर्चेत सहभाग घेतला.

आरोग्य मंत्री आबिटकर यांनी सांगितले की, आदिवासी भागांसह राज्यातील नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी चांगल्या रुग्णालयांना प्रोत्साहन देण्यात येणार असून, सेवा पुरविण्याचे निकष अधिक परिणामकारक करण्यावर भर देण्यात येणार आहे. लोकांच्या हितासाठी आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्याचे धोरण राज्य शासनाने निश्चित केले आहे.

रुग्णालयांकडून आकारल्या जाणाऱ्या मनमानी शुल्कावर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असून, बॉम्बे नर्सिंग ॲक्ट, महाराष्ट्र नर्सिंग ॲक्ट आणि क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट ॲक्टमध्ये आवश्यक स्पष्टता आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यामुळे भविष्यात 'राईट टू पेशंट' आणि 'राईट टू हॉस्पिटल' या संकल्पनांना बळ मिळून नागरिकांना दर्जेदार आणि माफक दरात उपचार उपलब्ध होतील, तसेच रुग्णांवर अनावश्यक आर्थिक भार पडणार नाही.

कर्करोग, न्यूरो आणि ऑर्थो उपचारांसाठी सर्वसमावेशक पॅकेजेस तयार करण्यात येणार असून, उपचारांसाठी रुग्णांना अतिरिक्त खर्च करावा लागू नये, यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. अपूर्ण उपचारांमुळे रुग्णांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये, यालाही प्राधान्य देण्यात येणार आहे.

कर्करोगाच्या लवकर निदानासाठी उपचार पॅकेजमध्ये 'पेट स्कॅन'चा समावेश करण्यात येणार असून, यामुळे रुग्णांचे निदान अधिक लवकर होऊन वेळेत उपचार सुरू करण्यास मदत होईल. तसेच फॉलो-अप पॅकेजेस आणि निदान प्रक्रियाही अधिक सुलभ व प्रभावी करण्यासाठी सुधारणा करण्यात येणार असल्याचे आरोग्य मंत्री आबिटकर यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande