निसान टेक्टॉन एसयूव्ही भारतात लॉन्च
मुंबई, 10 जुलै (हिं.स.)। निसान इंडियाने भारतीय बाजारात आपली बहुप्रतिक्षित मिड-साइज एसयूव्ही निसान टेक्टॉन अधिकृतपणे लॉन्च केली आहे. रेनॉल्ट डस्टरची कॉर्पोरेट ट्विन म्हणून ओळखली जाणारी ही एसयूव्ही 10.49 लाख रुपये एक्स-शोरूम सुरुवातीच्या किमतीत उपलब्
Nissan Tecton SUV Launched in India


मुंबई, 10 जुलै (हिं.स.)। निसान इंडियाने भारतीय बाजारात आपली बहुप्रतिक्षित मिड-साइज एसयूव्ही निसान टेक्टॉन अधिकृतपणे लॉन्च केली आहे. रेनॉल्ट डस्टरची कॉर्पोरेट ट्विन म्हणून ओळखली जाणारी ही एसयूव्ही 10.49 लाख रुपये एक्स-शोरूम सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध झाली आहे. टाटा सिएरा, मारुती सुझुकी विक्टोरिस, ह्युंदाई क्रेटा, किआ सेल्टोस, टोयोटा अर्बन क्रूझर हायरायडर आणि होंडा एलिव्हेट यांसारख्या लोकप्रिय एसयूव्हींशी टेक्टनची थेट स्पर्धा होणार आहे. जर तुम्हाला ते खरेदी करायचे असेल, तर तुम्ही २१,००० रुपये भरून ऑनलाइन किंवा जवळच्या डीलरशिपला भेट देऊन त्याची नोंदणी करू शकता.या गाडीच्या डिलिव्हरी 20 जुलैपासून सुरू होणार आहेत.

निसान टेक्टॉनला आधुनिक डिझाइनसोबतच मजबूत आणि रग्ड लूक देण्यात आला आहे. गाडीच्या पुढील भागात रुंद ग्रिल, एलईडी हेडलाइट्स आणि सी-शेप्ड डे-टाइम रनिंग लाइट्स देण्यात आले आहेत. मस्क्युलर बोनेट, मोठे व्हील आर्चेस आणि 18 इंच अलॉय व्हील्समुळे एसयूव्हीला दमदार स्टान्स मिळतो. मागील बाजूस आकर्षक टेललॅम्प आणि मजबूत बंपर डिझाइन देण्यात आले आहे. ग्राहकांसाठी टेक्टन 11 रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये सहा मोनोटोन आणि पाच ड्युअल-टोन रंगांचा समावेश आहे.

किंमतीच्या बाबतीत निसान टेक्टॉन विविध व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आली आहे. बेस व्हेरियंट विसिया टी160 मॅन्युअलची किंमत 10.49 लाख रुपये आहे, तर टॉप व्हेरियंट टेक्ना प्लस टी280 डीसीटीची किंमत 18.59 लाख रुपये आहे. याशिवाय विसिया प्लस, अॅसेंटा, एन-कनेक्टा आणि टेक्ना अशा विविध व्हेरियंटमध्ये ही एसयूव्ही उपलब्ध आहे.

निसान टेक्टॉनमध्ये दोन टर्बो पेट्रोल इंजिन पर्याय देण्यात आले आहेत. 1.0 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन 100 हॉर्सपॉवर आणि 166 एनएम टॉर्क निर्माण करते. या इंजिनसह 19.4 किलोमीटर प्रति लिटर मायलेज मिळते. तर 1.3 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन 163 हॉर्सपॉवर आणि 280 एनएम टॉर्क देते. या इंजिनचे मायलेज 18.5 किलोमीटर प्रति लिटर आहे. गाडीमध्ये सहा स्पीड मॅन्युअल आणि सात स्पीड डीसीटी ट्रान्समिशनचे पर्याय देण्यात आले आहेत. टेक्टनच्या इंटिरियरमध्ये प्रीमियम सुविधा देण्यात आल्या आहेत. यामध्ये 10.1 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 10.25 इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, वायरलेस चार्जर, व्हेंटिलेटेड सीट्स, ड्युअल झोन एसी, पॅनोरॅमिक सनरूफ आणि स्मार्ट पॉवर्ड टेलगेट यांसारख्या सुविधा मिळतात. तसेच गुगल बिल्ट-इन, गुगल मॅप्स आणि जेमिनी सपोर्टसुद्धा देण्यात आला आहे.

सुरक्षेच्या बाबतीत निसान टेक्टॉनमध्ये सहा एअरबॅग्स, एबीएस, ईएसपी, ट्रॅक्शन कंट्रोल, टीपीएमएस, हिल होल्ड कंट्रोल, 360 डिग्री कॅमेरा आणि एडीएएस तंत्रज्ञान देण्यात आले आहे. लेन कीप असिस्ट आणि ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंगसारख्या सुविधा गाडीला अधिक सुरक्षित बनवतात. आकर्षक किंमत, आधुनिक फीचर्स, दमदार इंजिन आणि मजबूत डिझाइनमुळे निसान टेक्टन मिड-साइज एसयूव्ही बाजारात मोठी स्पर्धा निर्माण करण्याची शक्यता आहे. भारतीय ग्राहकांसाठी ही एसयूव्ही स्टाइल, आराम आणि सुरक्षेचा चांगला मिलाफ घेऊन आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande