रक्षा पेन्शन समाधान आयोजन १७ व १८ जुलै रोजी
पुणे, 10 जुलै (हिं.स.)। रक्षा लेखा प्रधान नियंत्रक (पेन्शन) पुणे यांच्या वतीने १७ व १८ जुलै २०२६ रोजी पेन्शन अदालत व ‘रक्षा पेन्शन समाधान आयोजन’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम बीईजी सेंटर, खडकी, पुणे येथील जीएफ गेट परिसरात सकाळी १०
रक्षा पेन्शन समाधान आयोजन १७ व १८ जुलै रोजी


पुणे, 10 जुलै (हिं.स.)।

रक्षा लेखा प्रधान नियंत्रक (पेन्शन) पुणे यांच्या वतीने १७ व १८ जुलै २०२६ रोजी पेन्शन अदालत व ‘रक्षा पेन्शन समाधान आयोजन’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम बीईजी सेंटर, खडकी, पुणे येथील जीएफ गेट परिसरात सकाळी १० वाजता होणार आहे.

माजी सैनिक, वीरपत्नी, वीरपिता, वीरमाता, विधवा पत्नी यांनी पीपीओ, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, नोंदणीकृत मोबाईल तसेच इतर आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे. कार्यक्रमात पेन्शनधारकांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यात येणार असून संबंधितांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पुणे यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande